मोना लिसाचे चित्र हे नेहमीच लोकांना आश्चर्यात पाडते, तसेच मोहित करते. लिओनार्दो दा व्हींची यांनी हे चित्र काढले होते, जे कलेच्या क्षेत्रात विशेषत: चित्रकलेच्या क्षेत्रात आदर्श मानले जाते. मात्र कुणालाही संभ्रमात टाकेल असे चेहऱ्यावर भाव असणारी लिसा आपल्या पारंपरिक पेहरावाऐवजी भारतीय पेहरावात असती तर ती कशी दिसली असती? तुम्ही म्हणाल हे कसे शक्य. मात्र, ट्विटरवर पूजा नावाच्या एका तरुणीने काही छायाचित्र पोस्ट केले आहेत. यामध्ये मोना लिसा भारतीय पेहरावात दिसून येत आहे.

पूजा सांगवान नावाच्या एका ट्विटर युजरने विविध पेहरावात असलेल्या मोनालिसाचे छायाचित्र शेअर केले आहे. Resha_Weaves नावाच्या ट्विटर हँडलनेही हे फोटो शेअर केले आहेत. महाराष्ट्र, बिहार, कोलकाता, केरळ, तेलंगण, गुजरात, राजस्थान या राज्यांच्या पारंपरिक वस्त्रांमध्ये मोना लिसा दिसून येते. तिच्या चेहऱ्यावरील स्मित आणि भारतीय पेहराव तिच्या सुंदरतेत अधिक भर घालत आहे.

(Viral : कुठे लाकडाची ट्रेडमिल तर कुठे वीजनिर्मितीला बैलाचा आधार, भारतीयांचे भन्नाट जुगाड पाहिलेत का?)

अशी आहे महाराष्ट्रीयन मोना लिसा

महाराष्ट्रीयन पेहरावात मोनालिसा एकदम महाराष्ट्रीयन मुलगीची वाटत आहे. तिच्या चेहऱ्यावर चंद्रकोर, गळ्यात आणि कानात आभुषणे आणि तिने घातलेली साडी पाहून ती पूर्ण महाराष्ट्रीयनच दिसते. पूजाने या मोना लिसाला लिसा ताई असे संबोधले आहे. विविध पारंपरिक परिधानानुसार लिसाला संबोधण्यात आले आहे. राजस्थानी पेहरावात तिला महाराणी लिसा, बिहारी वस्त्रांमध्ये असलेल्या लिसाला लिसा देवी आणि गुंजराती वस्त्रातील लिसाला लिसा बेन असे संबोधले आहे.

पूर्ण भारतीय दिसतेय

लिसाला भारतीय वस्त्रांमध्ये बघण्याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. शेअर केलेली चित्रे खरच अप्रतिम आणि सुंदर आहे. लिसाचे मूळ छायाचित्र जेवढे भूरळ घालते कदाचित तितकेच आकर्षक आता हे छायाचित्र ठरतील. नेटकरी देखील लिसाला विविध वस्त्रांमध्ये पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत. भारतीय पेहरावाने ती विदेशातील स्त्री असल्याचे वाटत नाही.

‘ये फोटो जोरदार है’

पूजाने शेअर केलेल्या छायाचित्रांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. कलाकाराची सर्जनशिलता पाहून अनेक नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. लिसाच्या छायाचित्रांचे नेटकऱ्यांनी भरपूर कौतुक केले आहे.

Story img Loader