ली पर्वतावर गेल्या ९४ वर्षांपासून मोठ्या अक्षरांत हॉलिवूडचे नाव कोरले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कुठूनही सहजासहजी याचे दर्शन होते. पण नवीन वर्षांच्या सकाळी जेव्हा लॉस एंजिलिसचे नागरिक उठले तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण रातोरात हॉलिवूडचे (hollywood) नाव ‘हॉलिवीड’ (Hollyweed) झाले होते. एका रात्री अचानक हा बदल कसा झाला यामुळे सगळेच संभ्रमात पडले पण नंतर मात्र कोणीतरी नसता फाजीलपणा केला असल्याचे लक्षात आले.
वाचा : सैबेरियाच्या गोठवणा-या थंडीत प्रवास करणारी निधी तिवारी ठरली पहिली भारतीय महिला
ली पर्वतावर असलेल्या हॉलिवूड या अक्षरांबरोबर ३१ डिसेंबरच्या रात्री कोणीतरी छेडछाड केली. आणि हॉलिवूडचे स्पेलिंग चक्क हॉलिवीड असे केले. सकाळी उठल्यानंतर नावात झालेल्या एवढ्या मोठ्या घोळाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला पण नंतर कोणीतरी मुद्दाम या नावाशी छेडछेडा केली असल्याचे लक्षात आले. hollywood मधल्या दोन ‘O’ सोबत छेडछेडा करून तिथे ‘E’ असे लिहिण्यात आले. यातल्या प्रत्येक शब्दांची उंची ही जवळपास ४५ फूट आहे. त्यामुळे हा बदल करणे शारिरिदृष्ट्या सदृढ असलेल्या एका अॅथलेटिकचेच काम असावे असा तर्क पोलिसांनी काढला आहे. कारण एवढ्या उंचीवर सामान्य माणसांना चढणे शक्य नाही.
वाचा : ‘टायटॅनिक’ हिमनगावर आदळून बुडाले नव्हते
संपूर्ण काळे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने रात्री तीनच्या सुमारास हा बदल केला. त्याने पांढ-या रंगाने या नावात बदल केले. पोलीस आता सीसीटीव्ही फूटेज तपासत आहे. लवकरच या व्यक्तीचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नावत बदल करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही असे प्रयत्न करण्यात आले.