भारतीय हवाई दलातर्फे मुंबईकरांसाठी शनिवारी खास प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात हवाई दलाने सादर केलेल्या चित्तथरारक कसरती पाहून मुंबईकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दरम्यान हवाई दलाची रंगीत तालीम पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील थक्क झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावरील प्रेरणादायी आणि थक्क करणारे अनेक व्हिडीओ ते चाहत्यांसह शेअर करत असतात. दरम्यान, मुंबईमध्ये आज सादर करण्यात आलेल्या भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये भारतीय हवाई दलाची (IAF) विमान आणि हेलीकॉप्टर प्रात्यक्षिक सादर करताना दिसत आहे. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी दाखवलेल्या अचूकतेची आणि उत्कृष्टतेची एक झलक या व्हिडीओतून पाहायला मिळते. हे दृश्य अत्यंत विलक्षण होते. मरीन ड्राइव्हवर जमलेले प्रेक्षक ते कॅमेऱ्यात कैद करत होते.

हेही वाचा – अभ्यास न करता SSC JE परीक्षेत कसे पास व्हावे? आळशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने सांगितली भन्नाट ट्रिक; Video Viral

आनंद महिंद्रा यांनी शेअर केला हवाई दलाचा व्हिडीओ

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ शेअर करताना महिंद्रा यांनी लिहिले की, “मुंबईत आज आयएएफ एअर शोची रंगीत तालीम. अचूकता आणि उत्कृष्टता. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपण हा दृष्टिकोन वापरला पाहिजे. आयएएफ प्रेरणादायी आहे असे म्हणणे कमीपणाचे ठरेल.”सोशल मीडियावर मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांनी त्यांचे स्वतःचे कॅमेऱ्यात शूट केलेल व्हिडीओ आणि भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती अनुभव शेअर केले आहे.

हेही वाचा – डोळ्याचे पारणे फेडणारा भारतीय हवाई दलाचा शो चुकवू नका, मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे चित्तथरारक हवाई कसरती

भारतीय हवाई दलाचा मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथे एअर शो

मुंबईतील मरीन ड्राईव्हचा परिसरात भारतीय हवाई दलाकडून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस खास प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहेत. नागरीकांमध्ये सरंक्षण दलाबद्दलची रुची वाढावी, जास्ती जास्त तरुण संरक्षण दलाच्या सेवेत दाखल व्हावे या उद्देशाने दोन दिवसांच्या चित्तथरारक हवाई कसरतींचे आयोजन भारतीय हवाई दलाने केले आहे. भारतीय हवाई दलातील हेलिकॉप्टरची ‘सारंग’ टीम आणि विमानांची ‘सूर्य किरण’ टीम प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यासाठी मुंबईतील प्रसिद्ध ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणजेच मरीन ड्राईव्ह हा परिसर निवडण्यात आलेला आहे. आज आणि उद्या दोन दिवस दुपारी बारा ते एकच्या दरम्यान भारतीय वायू दलाच्या हवाई कसरती बघता येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Precision excellence anand mahindra awe inspired by iaf jets performing aerial ballet in mumbai snk