वर्धा जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरूने गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून श्वानाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाळीव प्राण्यांवर काही माथेफिरू हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले असून या हल्ल्याचा पुरावा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वर्धा येथील देवळी शहराच्या ठाकरे चौकात एका श्वानावर माथेफिरुने चाकूने केलेल्या हल्ल्याच्या धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यासंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी वर्ध्यातील ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने केली आहे.

अज्ञात माथेफिरुने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतर दूरवर जाऊन श्वानाने प्राण सोडला. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. ज्या ठाकरे चौकात ही क्रूर घटना घडली.

पाहा या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज…

ज्या ठाकरे चौकात ही घटना घडली तेथून पोलीस स्थानक अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. हातात खुलेआम चाकू घेऊन एक माथेफिरु परिसरात धिंगाणा घालतो ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी दिलीय.

Story img Loader