Pregnant Lady Video Viral On Internet: प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढतो म्हणजे बेबी बम्प दिसू लागतो. असं पोटाचा आकार न वाढता, बाळाला जन्म देणं म्हणजे आश्चर्यच नव्हे का? असं होणं शक्यच नाही असं तुम्ही म्हणाल. पण या अशक्य गोष्टीचा अनुभव देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या महिलेच्या प्रेग्नंन्सीचा नववा महिला सुरू असूनही बेबी बंप दिसून आलं नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, हे मात्र नक्की.

महिलेच्या आपल्या चमत्कारी प्रेग्न्सीचा व्हिडीओ शेअर केलाय. गर्भधारणेच्या अखेरीस स्त्री गर्भवती आहे हे आपण अनेकदा सहज शोधू शकतो. परंतु या व्हिडीओमध्ये महिलेचा नववा महिना सुरू असूनही ती गरोदर आहे हे तुम्ही ओळखू शकणार नाहीत. जोपर्यंत ही महिला स्वत: हे उघड करत नाही तोपर्यंत तुम्हाला तिच्या प्रेग्नंन्सीचा अंदाज सुद्धा येणार नाही. आता तुम्ही म्हणाल, प्रेग्नंन्सीचा नववा महिना सुरू असताना ती महिला गरोदर आहे हे ओळखता येणार नाही, असं शक्यच नाही. नवव्या महिन्यात महिलेच्या पोटाचा आकार वाढतोच. असं तुम्ही कितीही ठाम सांगितलं तरी हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला विश्वास बसणार नाही.

आणखी वाचा : कित्ती गोड! आई आणि बाळामधल्या या गोंडस क्षणाचा VIDEO VIRAL

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला दिसत आहे, तिचे नाव जोरान अर्सिला आहे. ती व्यवसायाने फिटनेस इंस्ट्रक्टर आहे आणि इन्स्टाग्रामवर ती सतत सक्रिय असते. या व्हिडीओमध्ये ती शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. फिटेड टॉप आणि शॉर्ट्समध्ये तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती प्रेग्नंट आहे. मात्र, व्हिडीओच्या शेवटी ती महिला उजवीकडे वळताच तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसेल. याचा व्हिडीओ तिने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय.

आणखी वाचा : बाबो! एका सिंहीणीसाठी दोन सिंह आपआपसात भिडले, पण दोघांच्या भांडणात सिंहीण पसार…पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “समोरून लपवता येत आहे… व्हिडीओ आधी टिकटॉकवर व्हायरल झाला होता, म्हणून आता इथेही शेअर करतेय…” यात जोरान अर्सिलाने स्वतः सांगितले की ती ९ महिन्यांची गर्भवती आहे.

आणखी वाचा : पोलिसच विना हेल्मेट! मग वरिष्ठांनी अशी अद्दल घडवली…, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कार एका खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात गेली, पाहा हा मजेदार VIRAL VIDEO

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तसंच तिच्या फिटनेसचं कौतुक करत भरभरून प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. तर काही लोकांनी या क जबरदस्त ऑप्टिकल इल्यूजन आहे. त्यामुळे समोरून पाहून ती ९ महिन्यांची गरोदर असल्याचे अजिबात समजले नाही, असं देखील म्हटलंय.

Story img Loader