Pregnant Woman gave birth to a baby in bus at Telangana: आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि आनंददायी अनुभव असतो. आई आणि तिच्या लेकराचं नात जगावेगळं असतं असं म्हणतात. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जगात आणणं आईसाठी काही सोप नसतं, अनेक वेदना सहन करून ती बाळाला या जगाची ओळख करून देते. सामान्यत: प्रसूतीसाठी कोणतीही स्त्री रुग्णालयात धाव घेते. परंतु, एका स्त्रीला चक्क बसमध्येच आपल्या लेकराला जन्म द्यावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना तेलंगणामध्ये घडली असून, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TGSRTC) बस कंडक्टरने या गर्भवती महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यासाठी मदत केली.

हेही वाचा… Raksha Bandhan: “तू मला वेडी…”, भावाला राखी बांधताना चिमुकलीच्या स्वॅगने केली सगळ्यांची बोलती बंद; रक्षाबंधनाचा VIDEO VIRAL

परिचारिका, बस कर्मचारी यांनी गर्भवती महिलेला केली मदत

गडवाल-वानपर्थी मार्गावर प्रवास करत असलेल्या एका महिलेला प्रवासादरम्यान प्रसूती वेदना होत असल्याचे जाणवले. हे कळताच भारती नावाच्या कंडक्टरने चालक आणि प्रवाशांना गर्भवती प्रवाशाच्या स्थितीबद्दल कळवले आणि तातडीने मदत मागितली. तेव्हा बस थांबवण्यात आली आणि कंडक्टर भारतीच्या मदतीला एक नर्स सामील झाली.

रक्षाबंधनासाठी निघाली होती महिला

संध्या असे या गरोदर महिलेचे नाव असून ती मूळची गडवालची असून रक्षाबंधनाच्या निमित्ताने ती वानापर्थीला जात होती. तिच्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जात असताना वाटेतच तिला प्रसूतीच्या कळा आल्याआणि त्या महिलेने बसमध्येच तिच्या बाळाला जन्म दिला.

रिपोर्टनुसार, संध्याने एका मुलीला जन्म दिला आणि पुढील वैद्यकीय सेवेसाठी तिला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. आई आणि नवजात बालक दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा… धक्कादायक! ध्वजारोहण करताना अंगावर पडला दगड अन् वयोवृद्ध कोसळला खाली; VIDEO पाहून बसेल धक्का

TGSRTC अधिकारी यांची घटनेबाबत माहिती

TGSRTC चे व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. सज्जनार यांनी एक्स पोस्टद्वारे लोकांना या घटनेची माहिती दिली. सार्वजनिक वाहतुकीमध्ये बाळाचा जन्म झाल्याची बातमी लोकांना कळवण्यासाठी त्यांनी तेलुगूमध्ये पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलं, “रक्षाबंधनाच्या सणानिमित्त प्रवासाला निघालेल्या एका गर्भवती महिलेची प्रसूती बसमधील महिला कंडक्टरने केली आणि माणुसकी दाखवली. रक्षाबंधनाच्या दिवशी बसमधील गर्भवती महिलेची मदत करण्यासाठी भारती TGSRTC या कंडक्टरचे व्यवस्थापनाच्या वतीने अभिनंदन. भारतीने तत्परतेने आणि नर्सच्या मदतीने वेळेवर प्रसूती केल्यामुळे आई आणि बाळ सुखरूप आहेत.”

बस कर्मचाऱ्यांच्या मदतीच्या वृत्तीचे कौतुक करून सज्जनार पुढे म्हणाले, “आरटीसी कर्मचारी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून सेवेची भावना दाखवत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.”