Overcrowded Vande Bharat Train : वंदे भारतला प्रीमियम ट्रेन, असे म्हटले जाते. ही ट्रेन देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. जलद आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक जण वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देतात. याच ट्रेनसंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर युजर्स रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. कारण- व्हिडीओमध्ये वंदे भारत ट्रेनमध्ये पॅसेंजर ट्रेनप्रमाणे खच्चून भरलेली गर्दी दिसत आहे. ट्रेनच्या कॉरिडॉरमध्ये प्रवासी उभे असलेले दिसतात.

वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ डेहराडून आणि लखनऊदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वंदे भारत’मध्ये सीट कन्फर्मेशनशिवाय प्रवास करण्यावर बंदी असली तरी व्हिडीओमध्ये बघायला मिळतंय की, विनातिकीट अनेक प्रवासी ट्रेनमध्ये शिरत आहेत. व्हिडीओ शेअर करून युजरने कॅप्शनमध्ये म्हटलेय की, आता प्रीमियम वंदे भारतचीही इतर गाड्यांप्रमाणेच हालत झाली आहे.

Colours of Navratri 2024 mumbai local train yellow colour video
Colours of Navratri 2024 : मुंबई लोकल रेल्वेस्टेशनवर पिवळा रंगाने वेधले सर्वांचे लक्ष, नवरात्री ट्रेंडची महिलांमध्ये क्रेझ
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Second Mpox case reported in Kerala as man who returned from the UAE tests positive google trends
भारताच्या चिंतेत वाढ! केरळमध्ये आढळला मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण; गूगल ट्रेंड्समध्ये असणारे मंकी पॉक्स म्हणजे नक्की काय?
MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
world’s first 3-D printed hotel
जगातलं पहिलं थ्रीडी प्रिंटेड हॉटेल नेमकं आहे कुठे? काय आहेत या हॉटेलची वैशिष्ट्ये?
Two Uncle's Inside Kolkata Metro over Push and Shove fight video
“बाईईई हा काय प्रकार” धावती मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO झाला व्हायरल
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?

किचनमधील सिलिंडर स्फोटाचे भीषण दृश्य; महिला जोरात कोसळली जमिनीवर अन्…; पाहा लाइव्ह VIDEO

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोक चढले आहेत. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की, ट्रेनच्या कॉरिडॉरमधून जाणेदेखील कठीण झाले आहे. एका प्रवाशाने या परिस्थितीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण वंदे भारतमध्ये अशाप्रकारची गर्दी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. सर्व रेल्वेस्थानकांवर मेट्रो यंत्रणा लागू करावी, असे एकाने लिहिलेय. जर तुमच्याकडे तिकीट नसेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्मवरही जाऊ शकत नाही. दुसऱ्या एकाने लिहिलेय की, ही गरिबांची ट्रेन नाही, ही ट्रेन श्रीमंतांसाठी आहे. आता त्यात एखादा गरीब चढला, तर तो त्याचा दोष असेलच ना?

जीवाशी खेळ! भारतीय ट्रेनसंबंधित VIDEO तील ‘त्या’ भीषण दृश्यामुळे युजर्स संतप्त; म्हणाले, “गरिबांना कोणी वाली…”

तिसऱ्या एका युजरने लिहिले की, या प्रकरणी आम्ही चीनचे अनुसरण केले पाहिजे; ज्यामध्ये तिकिटाशिवाय स्टेशनवर प्रवेश न मिळणे आवश्यक आहे. आणखी एकाने लिहिलेय की, जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीला ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी जागा मिळत नाही तेव्हा तो नक्कीच कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवेश करील. शेवटी एक युजर म्हणाला की, देशात श्रीमंतांसाठी अनेक गाड्या चालवल्या जातात; पण गरिबांसाठी किती ट्रेन चालवल्या भाऊ?