मथुरामध्ये ‘मेमरी गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली प्रेरणा शर्मा हिने आपल्या असामान्य स्मरणशक्तीच्या जोरावर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. फक्त १९ वर्षांची असलेली प्रेरणा हिची स्मरणशक्ती चकित करून सोडणारी आहे. ५०० वेगवेगळे आकडे तिने लक्षात ठेवले आणि फक्त ८ मिनिटे ३३ सेकंदात तिने ते उलट आणि सुटल क्रमाने अगदी अचूक सांगितले. त्यामुळे तिच्या नावाची नोंद आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
Video : विश्वविक्रम जीवावर बेतणाऱ्या कसरतीचा
गेल्याच वर्षी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘एशियाई रेकॉर्ड’मध्ये तिच्या नावाची नोंद झाली होती. त्यामुळे ही मेमरी गर्ल चर्चेत आली होती. पण यंदा मात्र कॅनडामधल्या अरविंद पशुपतिचा रेकॉर्ड मोडत तिच्या नावे नवा विश्वविक्रम जमा झाला आहे. अरविंदने २७० वेगवेगळे आकडे लक्षात ठेवले होते. याआधीही तिने एकाचा रेकॉर्ड मोडला होता.
Mathura (UP): 19-year-old Prerna Sharma creates Guinness World Record, memorises 500 random numbers with a timing of 8 minutes 33 seconds. pic.twitter.com/gAvq8WTBQa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 20, 2017
वाचा : दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम
प्रेरणाला एका फलकावर दिलेले आकडे ठराविक वेळत दाखवण्यात आले. प्रेरणाने हे सर्व आकडे लक्षात ठेवले. त्यानंतर हा फलक हटवण्यात आला. आधी क्रमाने तिने आकडे सांगितले त्यानंतर उलट क्रमाने देखील तिने हे आकडे सांगितले. हे सगळे आकडे तिने ८ मिनिटे ३३ सेकंदात अगदी अचूक सांगितले त्यामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे.