अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता अजूनही तरुणांमध्ये कायम आहे. अनेक तरुण मंडळी त्यांना ‘कूल प्रेसिडन्ट’ म्हणूनच ओळखतात. त्यांचा आदर्शही घेतात. त्यांचं वागणं, लोकांमध्ये सहजतेनं मिसळणं अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये तरुणांना भावतात. एका संवाद कार्यक्रमादरम्यान ओबामांनी आपल्या कॉलेजच्या दिवसातील एक किस्सा सांगितला.
डिझ्नेपार्क हे तेव्हा आणि आताही तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. लहान असताना मी दोनदा डिझ्नेपार्कमध्ये गेलो होते. पहिला अनुभव खूपच छान होता. शाळेत असताना डिझ्ने पार्कला भेट दिली होती ती माझी पहिली मोठी सहल होती. कॉलेजमध्ये असताना मी वेळ घालवण्यासाठी डिझ्नेलँडमध्ये गेलो होतो. पण, डिझ्नेलँडमधून मला बाहेर काढण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. अनेकांना यामागचं कारण जाणून घेण्याचं कुतूहल होतं.
आपण त्यावेळी पार्कचे नियम मोडून सिगारेट ओढत होतो. म्हणूनच मला या पार्कमधून बाहेर हाकलवण्यात आलं मात्र तुम्ही सिगारेट ओढणार नसाल तर कधीही पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी येऊ शकता असं म्हणत त्यांनी पुढच्याक्षणी दयाळूपणाही दाखवला. असा हा किस्सा ओबामांनी शेअर केला. सिगारेट ओढत असल्यानं मला पार्कमधून बाहेर काढलं हे सांगायलाही मला लाज वाटते असंही ते म्हणाले.