नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूमागचे गुढ अजूनही कायम आहे. यामागे अनेक तर्कवितर्क काढण्यात आले पण त्यांच्या मृत्यूचे गुढ काही सुटले नाही. जेव्हा नेताजी ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते तेव्हा ब्रिटिशांच्या डोळ्यात धुळ फेकत त्यांनी एका जर्मन बनावटीच्या गाडीमधून पलायन केले होते. १९४१ मध्ये ब्रिटिशांना चकवा देत नेताजींनीं गोमो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी या गाडीचा वापर केला होता. या गाडीची पुर्नरचना करण्यात आली असून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते गुरूवारी या गाडीचे अनावरण करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ‘वाहने सावकाश चालवा!’ अपघातात गर्भवती पत्नी गमावलेल्या पतीची कळकळीची विनंती

१९४१ची गोष्ट. नेताजी सुभाष चंद्र बोस ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. तेव्हा अत्यंत शिताफिने ब्रिटिशांना चकमा देत त्यांनी एका जर्मन कारमधून पलायन केले. दिल्लीची ट्रेन पकडण्यासाठी त्यांनी गेमो स्टेशनपर्यंत पोहचण्याकरता याच गाडीचा वापर केला होता. हे संपूर्ण पलायननाट्याला ‘महानिष्क्रमण’ नाव देण्यात आले. या घटनेला बुधवारी ७६ वर्षे झाली तसेच १९ जानेवारीला नेताजी रिसर्च ब्यूरोचा ६० वा वर्धापन दिन होता. या प्रसंगाचे औचित्य साधून नेताजींच्या पुर्नरचना केलेल्या गाडीचे अनावरण प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.

Viral : सावधान! मशीनमध्ये गेलेल्या पाचशेच्या नोटेची अशी होतेय दुर्दशा

ही जर्मन वँडरर सिडन कार होती. नेताजींच्या मृत्यूनंतर १९५७ नंतर ही गाडी नेताजी रिसर्च ब्युरोलाच्या स्वाधीन करण्यात आली. त्यानंतर एका जपानी कार्यक्रमासाठी ही कार वापरण्यात आली होती. मे २०१६ मध्ये कोलकता ऑडीने या गाडीची पुर्नरचना करण्याचे काम हाती घेतले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee unveils netaji subhas chandra bose car