इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे. त्याआधी सौदी अरेबियात एवढ्या महागड्या किमतीत एक उंट विकला गेला आहे, जे ऐकून तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. या उंटाची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हा जगातील सर्वात महागडा उंट असल्याचे बोललं जातंय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या उंटासाठी ७ मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे १४ कोटी २३ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे.
‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबियामध्ये या उंटासाठी सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पारंपारिक वेशभूषा केलेला एक व्यक्ती मायक्रोफोनद्वारे लिलावात बोली लावताना दिसत आहे.
Viral Video : नदीच्या किनारी उभी राहून बनवत होती रील्स; पुढे जे झाले ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल
रेल्वे रुळावर कुत्रा बसलेला असतानाच अचानक ट्रेन आली पण…; पाहा काळजात धस्स करणारा व्हिडीओ
उंटाची सुरुवातीची बोली ५ मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे १० कोटी १६ लाख रुपये ठेवण्यात आली होती. यानंतर त्याची बोली ७ दशलक्ष सौदी रियालच्या बोलीवर अंतिम करण्यात आली. मात्र, एवढी जास्त बोली लावून उंट कोणी विकत घेतला, याचा खुलासा झालेला नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंटाला एका लोखंडी कुंपणात ठेवण्यात आले आहे. तसेच, पारंपारिक कपडे परिधान केलेले लोक लिलावात सहभागी झालेलेही दिसत आहेत.
सौदी अरेबियात एवढ्या महागड्या किमतीत लिलाव झालेला हा उंट जगातील दुर्मिळ उंटांपैकी एक मानला जात आहे. हा उंट त्याच्या खास सौंदर्य आणि वेगळेपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जगात या प्रजातीचे उंट फार कमी आहेत. सौदी अरेबियाच्या लोकांच्या जीवनात उंटांचा समावेश आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. सौदी अरेबियामध्ये ईदच्या दिवशी उंटांचा बळी दिला जातो. तसेच, सौदी अरेबियात जगातील सर्वात मोठा उंट मेळाही भरतो.