घरात सगळ्यात पहिले उठून सगळ्यात शेवटी झोपणारी कुटुंबातील एकमेव सदस्य म्हणजे ‘आई’. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून दिवसरात्र काम करणाऱ्या आईच्या कष्टाल, तिच्या कामाला कोणतीही सुट्टी नाही. पण, तिचे अनुभवाचे , कष्टाचे धडे आयुष्यभर लक्षात राहतील हे मात्र खरे. तर आज आयएफएस (IFS) अधिकारी हिमांशू त्यागी यांनी त्यांच्या आईच्या प्रवास बघून अनुभवाचे बोल सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयएफएस (IFS) अधिकारी हिमांशू त्यागी यांची आई फक्त इयत्ता आठवी पर्यंत शिकली आहे. तसेच त्यांचे लग्न १६ व्या वर्षी झाले व त्यांनी लगेच कौटुंबिक जवाबदाऱ्या सुद्धा स्विकारल्या. सामाजिक आव्हानांना तोंड देत आयएफएस अधिकारी यांच्या आईने आयुष्यभर अनेक त्याग केले. आईच्या उल्लेखनीय प्रवासातून हिमांशू त्यागी यांनी पाच धडे शिकले आहेत. तर हे पाच धडे त्यांनी त्यांनी एक्स (ट्विटर) युजर्स बरोबर शेअर करण्याचे ठरवले आहेत.
पोस्ट नक्की बघा…
आयएफएस अधिकारी यांनी शेअर केलेल्या पाच टिप्स पाहू…
१. कधीही हार मानू नका – सतत प्रयत्न करत राहा. परिस्थिती तुम्हाला अपयशी ठरवेल. पण, तुम्ही हार मानू नका .
२. चांगलं जीवन जगा – प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले आणि वाईट गुण असतात. पण, तुम्ही नेहमी चांगुलपणा व चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
३. वेळ बदलण्याची प्रतीक्षा करा – तुमच्या वाईट काळात हार मानू नका. कारण जगात कोणतीही गोष्ट स्थिर नसते. एक दिवस तुमचा वाईट काळ संपून तुमचा चांगला काळ सुरू होईल. त्या दिवसापर्यंत स्वतःला सिद्ध करत राहा.
४. वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका – बोलून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका व स्वतःवर काम करा.
५. स्वतःचे अनुसरण करा, समाजाचे नाही – तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ; अशा पाच टिप्स हिमांशू त्यागी यांनी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट आयएफएस (IFS) अधिकारी हिमांशू त्यागी यांच्या @Himanshutyg_ifs या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. आयएफएस अधिकारी यांनी आई बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्ट मातृदिनानिमित्त असली तरीही त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी ठरेल अशी आहे.