नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांनी नवीनवीन प्रचारतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे, यात सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. दरम्यान आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांच्या एक्स अकाऊंटमध्ये बदल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
तेलंगणातील पराभवानंतर के. चंद्रशेखर राव कुठे आहेत? बीआरएसचे नेतृत्व कुणाकडे? (फोटो सौजन्य पीटीआय)
Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो बदलले आहेत. मोदींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरील कव्हर फोटोही बदलला असून शपथविधीनंतरचा संपूर्ण मंत्रीमंडळाचा फोटो त्यांनी कव्हरला ठेवला आहे. आपला प्रोफाइल फोटोही मोदींनी बदलला असून पिवळ्या मोदी जॅकेटमधील नवा प्रोफाइल फोटो त्यांनी ठेवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी प्रोफाईल

हेही वाचा >> टॉयलेटमध्ये बसून ऑनलाईन मीटिंग अटेंड करत होता नेता; चुकून कॅमेरा ऑन झाला अन्…VIDEO झाला VIRAL

शिखर परिषदेत कोणत्या विषयांवर चर्चा होणार?

इटलीत होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, जपान, ब्रिटन या देशाच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी जी ७ शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच आदी जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Story img Loader