PM Modi Photo on Hall Ticket: बिहारमधील दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठातील वार्षिक परीक्षेच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, काँग्रेस नेते राहुल गांधी, क्रिकेट स्टार महेंद्रसिंग धोनी यांचे फोटो असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की प्रवेशपत्रिकांवर वेगळ्या तपशीलांसह राजकीय नेते व सेलिब्रिटींचे फोटो दिसत आहेत.

मधुबनी, समस्तीपूर आणि बेगुसराय जिल्ह्यांतील कॉलेजमधील बीएच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रवेशपत्रकावर हे फोटो असल्याची तक्रार करत पोस्ट शेअर केली आहे. ललित नारायण मिथिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेजात हा प्रकार घडल्याचे समजतेय. दरभंगा येथील मुख्यालयात विद्यार्थ्यांनी याची तक्रर केली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची पंतप्रधानांवर टीका? म्हणाले ‘देशाला खोटे आश्वासन..’, Viral Video मागे ‘हे’ आहे सत्य!

“सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या या माहितीची दखल घेण्यात येईल व त्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यानुसार तक्रार दाखल केली जाईल” असे विद्यापीठाचे कुलसचिव मुश्ताक अहमद यांनी सांगितले.

Queen Elizabeth II Death: महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निरोपाला निसर्गानेही साधला दुर्मिळ योग, पाहा Video

प्रवेशपत्रे ऑनलाइन जारी केली गेली होती, ती संबंधित विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली होती, त्या सर्वांना लॉगिन तपशील प्रदान केले गेले होते. “विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रे तयार करण्यासाठी आमच्या डेटा सेंटरद्वारे प्रक्रिया केलेले फोटो आणि इतर तपशील अपलोड करायचे होते. त्यांच्यापैकी काही जणांनी जर मुद्दाम चुकीचे फोटो अपलोड केले असतील त्यांच्यावर कारवाई केले जाईल.

पाहा ट्वीट

दरम्यान, २०१८ मध्ये उत्तर प्रदेशमधील एका महाविद्यालयात अशाच प्रकारे विद्यार्थ्याला अमिताभ बच्चन यांचा फोटो असलेले प्रवेशपत्र मिळाले. तर आणखी मुझफ्फरपूरमध्ये, एका विद्यार्थ्याच्या अॅडमिट कार्डमध्ये बॉलीवूड स्टार इमरान हाश्मी आणि सनी लिओन यांची नावे अनुक्रमे वडील आणि आईसाठी असलेल्या कॉलममध्ये दाखवली होती.