पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आले आहे आले. आज (मंगळवारी) सकाळी पुण्यात आगमन झाले. दरम्यान पतप्रधान मोदीं यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले त्यांनी ‘श्रीं’ची आरती, अभिषेकही केला. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मोदींच्या पुणे दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींचे तुळशीबाग, भाजीमंडईत फेरफटका मारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. हे फोटो पाहून सर्वजण चकित झाले आहे. चला जाणून घेऊन या व्हायरल फोटो मागील सत्य.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये आता एआय फोटोंची सुद्धा भर पडली आहे. तुळशीबाग, मंडईसह पुण्यातील काही ठिकाणी मोंदीच्या भेटीचे फोटो हे खरे नसून एआयने तयार केलेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे फोटोग्राफर निखिल जगताप यांनी एआय फोटो तयार केले आहेत.

जर पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणी भेट दिली तर ती कशी असेल याची कल्पना करुन हे फोटो तयार करण्यात आले आहे. या मोंदीच्या पुणे दौऱ्याच्या एआय फोटोमध्ये पुणे मेट्रो स्टेशन, महात्मा फुले भाजी मंडई, तुळशीबाग, मार्केट यार्ड फुलबाजार, मार्केट यार्ड भाजी मार्केट, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पु. ल देशपांडे उद्यान ही ठिकाणे दिसत आहे.

हेही वाचा – दोरीवर उड्या मारणाऱ्या मुलांना पाहून थक्क झाले आनंद महिंद्रा, शेअर केला World Jump Rope Championshipचा व्हिडीओ

एका एआय फोटोमध्ये पंतप्रधान मोदी मेट्रोमधील प्रवास करताना दिसत आहेत.

एका एआय फोटोमध्ये, दगडू शेठ गणपती मंदिरांमध्ये पंतप्रधान मोदी हात जोडून श्रींचे दर्शन घेताना दिसत आहे.

एका एआय फोटोमध्ये, तुळशीबागेतील भेटीमध्ये एका फोटोत पंतप्रधान मोदी खरेदी करताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या हातात एक बॅग आहे आणि त्यांच्या आसपास काही महिला दिसत आहेत.

हेही वाचा – Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्यात रोड शो, पुणेकरांची तुफान गर्दी

एका एआय फोटोमध्ये , महात्मा फुले भाजी मंडई, मार्केट यार्ड फुलबाजार, मार्केट यार्ड भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारताना पंतप्रधान मोदी दिसत आहे. मोंदीच्या आजबाजूला सर्व सामान्य व्यक्ती दिसत आहेत.

एका एआय फोटोमध्ये पु. ल देशपांडे उद्यानामध्ये काही लहान मुलांबरोबर पंतप्रधान मोदी गप्पा मारताना दिसत आहे.

का एआय फोटोमध्ये, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला पंतप्रधान मोदींनी भेट दिल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modis memorable visit to pune through ai snk