PM Modi House Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २७ डिसेंबरला नवी दिल्ली येथील 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थी वर्गाचा पाहुणचार केला. मोदींच्या युट्युब चॅनेलवर या भेटींदरम्यानच्या संवादाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मोदींच्या निवासस्थानातील कार्यालय जवळून पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. हा व्हिडीओ शेअर करताना अन्य सोशल मीडियावर एका खास कॅप्शनसहित पोस्ट करण्यात आली होती, ज्यानुसार विद्यार्थ्यांनी मोदींच्या कार्यालयाला पूर्ण गुण दिले आहेत आणि त्यामुळे मोदींचं कार्यालय अंतिम चाचणी उत्तीर्ण झाले आहे असे म्हणता येईल.
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थी वर्गाला निमंत्रण देण्यात आले होते. व्हिडिओमध्ये मोदी त्यांच्या निवासस्थानी मुलांशी गप्पा मारताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनी मोदींच्या निवासस्थानी पंतप्रधानांचे कार्यालय, मंत्रिमंडळ कक्ष आणि इतर अनेक खोल्या पहिल्या. व्हिडीओमध्ये काही मुले मोदींशी बोलताना आम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे असे म्हणतानाही ऐकू येत आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या X वरील एका पोस्टमध्ये, लिहिल्याप्रमाणे, “जिज्ञासू तरुणांनी 7 लोककल्याण मार्गावरील घराची भेट घेतली. लोककल्याण मार्गावरील घर स्पष्टपणे एक उत्कृष्ट अनुभवासाठी तयार आहे. माझं कार्यालय अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दिसते – त्यांनी याला थम्स अप दिले!” मुलांना पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाची झलक पाहण्याची संधी मिळाल्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
Video: नरेंद्र मोदी यांचे शासकीय निवासस्थान आतून कसे दिसते?
हे ही वाचा<< इस्त्रायलचे पंतप्रधान ठरले ‘किलर ऑफ द इयर’? प्रसिद्ध मासिकाचं कव्हर पेज चर्चेत, टेलर स्विफ्टशी काय आहे संबंध, पाहा
दरम्यान, मोदींच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यापासून १ लाख १५ हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अधिकृत यूट्यूब चॅनेलने काही दिवसांपूर्वीच एक मोठी मजल मारली होती. या चॅनेलवरील तब्बल 20 दशलक्ष सबस्क्राइबर्ससह मोदी हे सर्वाधिक सबस्क्राइबर्स असणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवरच नव्हे तर सर्वच सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.