PM Modi Empty Pot Video: मोदींच्या AI निर्मित आवाजातील गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती, तुम्हीही आजवर अशा कलाकारीचे व्हिडीओ पाहिलेच असतील. साधारण या मजेशीर पोस्ट पाहिल्यावर हा अंदाज येतोच की मोदींच्या सोशल मीडिया पोस्टची ऑनलाईन क्रिएटर्स वाटच पाहत असतात. आता सुद्धा मोदींचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नालिज्म दिसून आले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रिकाम्या भांड्यातून ‘माती ओतताना’ दिसत आहेत. यावरून अनेकांनी तपास न करता थेट टीकास्त्र उगारले आहे. सर्वात आधी हा व्हिडीओ काय होता व त्यावरून काय दावा केला जातोय हे पाहूया आणि मग याची खरी बाजू सुद्धा जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
X युजर Nimo Tai ने व्हायरल विडिओ, व्हायरल दाव्या सह शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील समान दाव्यांसह हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून आणि कीफ्रेम मिळवण्यासाठी InVid टूलमध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला. त्यानंतर व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला या द्वारे काही व्हिडिओस आणि रिपोर्ट्स सापडल्या. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर ‘मेरी माती मेरा देश’ वरून पोस्ट केलेली एक रील सापडली, जिथे मोदी मडक्यातून माती अर्पण करताना दिसत आहेत.
आम्हाला पीएम मोदींच्या यूट्यूब अकाऊंटवर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला, ज्याचे शीर्षक आहे, ‘पीएम मोदींनी कपाळावर मातीचा टिळा लावला | मेरी माती मेरा देश | अमृत कलश यात्रा.
या व्हिडीओमध्येही मडक्यातून माती टाकली जात असल्याचे दिसत आहे. आम्हाला याबद्दल काही बातम्या देखील आढळल्या.
ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘मेरी माती, मेरा देश’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ७०० हून अधिक जिल्ह्यांमधून माती वाहून नेणाऱ्या देशाच्या विविध भागांतील लोक दिल्लीतील कर्तव्य पथावर जमले होते.
निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रिकाम्या मडक्यातून माती ओतताना दिसतात, तो एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मडक्यातून माती ओतताना दिसत आहेत.