एखाद्या देशाचा पंतप्रधान अगदी सामान्य माणसाची भेट घेणार असतील तरी चार-पाच गाड्या, अंगरक्षक असा लवाजमा सोबत घेऊन निघतात. मग ते पंतप्रधान राजाला भेटायला गेले तर किती मोठा ताफा घेऊन जातील हे वेगळं सांगायला नको. पण काही लोक असेही आहेत जे या सगळ्या जंजाळात न अडकता अगदी साधं सरळ आयुष्य जगतात. अशा लोकांच्या यादीत नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांचाही समावेश आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला त्यांचा एक फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : मुंबई पोलिसांचा दिलदारपणा, तक्रारदाराला दिला सुखद धक्का

मार्क रूट नेदरलँडच्या राजाला भेटायला जातानाचा हा फोटो आहे. यामध्ये ते चक्क सायकलवरून प्रवास करतायतं. व्यवस्थित सुटबूट परिधान केलेले मार्क रूट राजवाड्याजवळ आल्यानंतर आपली सायकल पार्क करतात आणि आतमध्ये जातात, असे या फोटोंमध्ये दिसत आहे. एरवी एखाद्या देशाचे पंतप्रधान म्हटल्यावर त्यांच्या मदतीसाठी शेकडो लोक एका इशाऱ्यावर धावून येतील. पण मार्क रूट कोणाचीही मदत न घेता अत्यंत साधेपणाने राजवाड्यात आले आणि निघूनही गेले.

मार्क रुट हे २६ ऑक्टोबरला पुन्हा एकदा नेदरलँडसच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्ताने रूट यांनी राजांची भेट घेतली. नेदरलँडमध्ये सायकलवरून प्रवास करणं हे काही नवं नाही. येथील ३६ टक्के जनता सायकलवरूनच प्रवास करते. त्यामुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही होत नाही आणि व्यायामही होतो म्हणून नागरिकांची सायकलला पसंती असते. जून महिन्यात जेव्हा पंतप्रधान मोदी नेदरलँड दौऱ्यावर होते तेव्हा रुट यांनी मोदींनाही सायकल भेट दिली होती.

वाचा : सेल्फीप्रेमींना ‘शो ऑफ’साठी पैशाच्या मोबदल्यात तो द्यायचा सिंहाचा बछडा