भारतात १ रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत नोटांची छपाई केली जाते. या नोटांचा वापर करून दैनंदिन व्यवहार केला जातो. सध्या देशात १, २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांची नोट चलनात आहे. २०१६ साली झालेल्या नोटाबंदीनंतर हजार रुपयांची नोट बाद करण्यात आली आहे. तर पाचशेच्या जुन्या नोटा चलनात नाही. त्याऐवजी नवी ५०० रुपयांची नवी नोट छापण्यात आली आहे. मात्र तुम्ही कधी शून्य रुपयांच्या नोटेबद्दल ऐकलं आहे का? देशात शून्य रुपयांची नोट छापली गेली होती. नेमकी का छापली होती? शून्य रुपयांची नोट जाणून घ्या.
एका खास मोहिमेंतर्गत शून्य रुपयांची नोट छापण्यात आली होती. भ्रष्टाचाराविरुद्ध एका संस्थेनं या नोटा छापल्या होत्या. २००७ साली दक्षिण भारतातील एनजीओ 5th Pillar ने जवळपास पाच लाखांच्या नोटा छापल्या होत्या. हिंदी, तेलगु, कन्नड आणि मल्लाल्यम या चार भाषेत नोटा छापून वाटल्या होत्या. या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तसेच चलनात असलेल्या नोटांसारखी ही नोट दिसत आहे. मात्र या नोटेचा बाजारमूल्य शून्य असल्याने भ्रष्टाचाराविरुद्ध वापरलेलं प्रभावी हत्यार ठरलं. 5th Pillar संस्था लाच मागण्याऱ्यांना ही नोट देत होती. या संस्थेचे तामिळनाडुच्या काही जिल्ह्यांमध्ये कार्यालय होती. याचं मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि राजस्थानच्या पालीमध्ये याचं कार्यालय आहे.
Viral Video: अजगरासोबत केलेली मस्ती अंगाशी आली; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल….
शून्य रुपयांच्या नोटेवर काही संदेश लिहिण्यात आले होते. या माध्यमातून भ्रष्टाचार संपण्यासाठी एक पाऊल उचललं गेलं. ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कुणी लाच मागितली तर या नोटा द्या आणि आम्हाला सांगा’, ‘ना घ्यायची ना द्यायची शपथ घेऊयात’, असे संदेश यावर लिहीले आहेत. तसेच नोटेच्या डाव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर आणि ईमेल आयडी छापला होता.