सूरतमधल्या एका साडी विक्रेत्याने चक्क २ हजारांच्या नव्या नोटेची प्रिंट असलेल्या साड्या आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही नवी नोट ९ नोव्हेंबर नंतर चलनात आली आणि या साडीविक्रेत्याने त्यापासून साड्याही तयार केल्या. आधीच गुलाबी रंग म्हणजे महिलांचा सगळ्यात आवडता रंग त्यातून अशी दोन हाजारांच्या नोटेची प्रिंट असलेली गुलाबी साडीला मोठी पसंती महिला वर्गात मिळताना दिसत आहे.

VIDEO: नोटाबंदीनंतर व्यापाऱ्याने शोधला ‘मोदी साडी’चा उतारा!

सूरतमधल्या शंकर भाई सैनी यांनी ही नवी साडी बनवली आहे. फक्त सूरतमध्येच नाही तर आता देशभरातील महिलावर्गाकडून या साडीला मोठी मागणी आहे. अशा प्रकारची साडी नक्कीच महिला वर्गात प्रसिद्ध होईल हे हेरूनच त्यांनी अशी साडी तयार केली. विशेष म्हणजे या साडीची किंमत फक्त १६० रुपये ठेवली आहे. या साडीवर २ हजारांच्या ५०४ नोटांचे प्रिंट पाहायला मिळणार आहे. अशी साडी खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली नाही तर नवलच म्हणावे लागले.

वाचा : फक्त एक १ रुपयात साडी; नियम आणि अटी लागू

तर नोटांबदीनंतर आणि मोदींची लोकप्रियता लक्षात घेऊन दादरमधील एका व्यापाराने मोंदीचे छायाचित्र असलेल्या साड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. ५०० पासून ते ९५० रुपयांपर्यंत किंमत असेलली ही साडी मुंबईकरांमध्ये विशेष प्रसिद्ध झाली होती. या दुकानाने आतापर्यंत २६०० साड्यांची विक्री केली होती.

Story img Loader