उत्तर प्रदेश पोलिसांशी संबंधित अनेक विचित्र घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात किंवा चर्चेत राहतात. उत्तर प्रदेशातील हरदोई येथील असेच एक ताजे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हजेरीसाठी न्यायलायात नेत असताना एका आरोपीने हवालदाराला दारू पाजली आणि नंतर तेथून तो फरार झाल्याची घटना समोर आली आहे.
सुनावणीसाठी आणलेला कैदी फरार –
२०१८ मध्ये सीतापूर येथील रहिवासी असलेल्या फुरकानला हरदोईच्या कोतवाली शहर पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून तो जिल्हा कारागृहात होता. ४ ऑगस्ट रोजी त्यांला न्यायालयात हजेरीसाठी आणलं होतं. अशा स्थितीत त्याला पोलीस लाईनमध्ये तैनात कॉन्स्टेबल उमानाथ श्रीवास्तव याच्याबरोबर हजेरीसाठी तुरुंगात पाठवलं होतं.
हवालदार दारुच्या नशेत आढळला –
न्यायालयात निघालेला हवालदार आणि आरोपी सायंकाळी परत न आल्याने एकच खळबळ उडाली. दोघांचा शोध सुरू केला असता हवालदार त्याच्या खोलीत दारुच्या नशेत आढळून आला, तर फुरकानचा अद्याप तपास लागलेला नाही. दुसरीकडे, हवालदाराला नशेत असण्याचे कारण विचारले असता, तो काहीही सांगू शकला नाही.
वृत्तानुसार, हवालदार ड्रग्ज व्यसनी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनावणीदरम्यान फुरकानच्या मित्रांनी हा प्लॅन ठरविल्याचे बोलले जात आहे. हवालदार फुरकानला घेऊन त्याच्या खोलीत पोहोचला होता, तिथे दारू पिऊन कॉन्स्टेबल नशेच्या अवस्थेत सोडून तेथून पळून गेला आणि हवालदार झोपून राहिला. ही बाब समोर आल्यानंतर उमानाथला निलंबित करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आरोपी आणि दारूच्या नशेत सापडलेला हवालदार यामुळे हरदोई पोलिसांची चांगलीच अडचण झाली असून सोशल मीडियावर या प्रकरणावरून नेटकरी सरकारवर टीका करत आहेत.