Prisoner Dance Video : एका कैद्याचा एक मजेशीर डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओतील कैद्याने जवळपास ११ महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची कन्नौज तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, यावेळी त्याने तुरुंगाबाहेर डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुरुंगाबाहेर डान्स करून कैद्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. कैद्याचा डान्स पाहिल्यानंतर तेथील उपस्थित पोलिसही टाळ्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
कैद्याने सुटका होताच तुरुंगाबाहेर आनंदाने मारल्या उड्या
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील एका तुरुंगाबाहेरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओतील व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती; पण जेव्हा त्याची सुटका झाली तेव्हा त्याने आनंदाने उड्या मारल्या. तुरुंगाच्या दरवाजातून बाहेर येताच तो डान्स करू लागला. हा कैदी दंड भरण्यास सक्षम नसल्याने अनेक महिन्यांपासून तुरुंगातून बाहेर पडू शकला नव्हता. पण, न्यायालयाने सुनावलेली शिक्षा पूर्ण करून, तो बाहेर आला आणि चक्क पोलिसांसमोरच डान्स करू लागला. यावेळी पोलिसांनी टाळ्या वाजवून, त्याला प्रोत्साहन दिले.
शिवा नगर असे या कैद्याचे नाव असून, तो ११ महिन्यांपासून तुरुंगात होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. न्यायालयाने त्याला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याच्यावर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता; पण तो रक्कम भरण्यास सक्षम नव्हता. शिवा अनाथ असल्यामुळे त्याची बाजू मांडण्यासाठी कोणीही नव्हते.
कैद्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल
पाऊल थकलं न्हाई! आजी-आजोबांचं ‘असं’ प्रेम मिळायला नशीब लागतं; VIDEO पाहून पाणावतील डोळे
तो छिब्रामाळ येथील कांसीराम कॉलनी येथील रहिवासी आहे. अशा स्थितीत संविधान दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नातून त्याची आणि त्याच्या आणखी एका साथीदाराचीही सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतरचा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.