जगातल्या अतिश्रीमंतांची जीवनशैली काहीतरी वेगळीच असते. उंची हाॅटेल्स, महागड्या गाड्या आणि प्रायव्हेट जेट्स. जगभर सफर करायला स्पेशल ट्रीटमेंट आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोचले की सुध्दा बडदास्त ठेवायला लोकांच्या झुंडी.

आणि अशा व्यक्ती राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असल्या तर विचारायलाच नको.

सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती अबुधाबीचे युवराज. यांचं नाव आहे शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. अबुधाबीचे हे युवराज यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुखे पाहुणे होते. त्यांचं व्यक्तिगत विमान सध्या चर्चेचा विषय ठरलंय.

हे युवराज भारतात आले ते याच विमानाने. या विमानाचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर आणि व्हाॅट्सअॅपवर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये या आलिशान विमानाची सफर आहे.

काय त्या युवराजांचा थाट, काय त्यांचं विमान. हे काही साधंसुधं विमान नाहीये. तर लक्झरियस पर्सनल ट्रॅव्हलसाठी हे विमान खास डिझाईन केलं गेलंय. स्वत: युवराज आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे खास पाहुणे फाईव्हस्टार स्टाईलमध्ये जगभर प्रवास करू शकतात. या विमानात एक खास लाऊंज आहे. बिझनेस मीटिंग करायची आहे? काॅन्फरन्स रूमही तयार आहे. युवराजांसाठी खास शयनकक्ष आहे. त्याच्या शेजारीही  एक विशेष लाऊंज आहे.

या विमानातली बाथरूम्ससुध्दा उंची आहेत. त्यात जगातल्या महागातल्या महाग बाथरूम फिटिंग्ज आहेत (म्हणजे नळ हो!)

हा व्हिडिओ सध्या व्हाॅट्सअॅप आणि यूट्यूबवरून शेअर होतोय. हा एकूण दोन मिनिटांचा व्हिडियो आहे. या व्हिडिओमध्ये  या विमानात थोडेच लोक दिसत आहेत. या विमानात तीन एअर होस्टेसेस सुध्दा दिसत आहेत. हा व्हिडिओ संपत असताना या विमानाचं किचन आणि काॅकपिटचा भाग दिसतो.

सौजन्य-यूट्यूब

पण कसं काही असो. आपल्याला गणपतीत कोकणात जायचं रिझर्व्हेशन मिळालं तरी आपण त्या ट्रेनचे राजे असतो. ते समाधान युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यानला कधीच नाही कळायचं.

 

Story img Loader