सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी कुणाच्या फजितीचे व्हिडीओ तर कधी विनोदी व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या मात्र एक वेगळीच गोष्ट व्हायरल झाली आहे. लॉकडाउन काळात ऑनलाइन क्लास हा नवीनच प्रकार असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. तर अनेक विचित्र गोष्टीही या ऑनलाइन क्लासमध्ये घडल्याचं समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना एक अजब प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. यावर विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं ते पाहून तर आणखी हसू आवरणं अवघड होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन क्लास सुरू असल्याचं दिसून येतंय. यात शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याने जे उत्तर दिलंय ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल. या ऑनलाइन क्लासमध्ये एडनोव्हेटचे संस्थापक सदस्य आणि सीए धवल पुरोहित हे त्यांच्या सीएच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. यावेळी ते विद्यार्थ्यांना विचारतात, “सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की, एक क्वार्टरमध्ये किती असतं? हित्वेक बेटा सांग मला एका क्वार्टरमध्ये किती असतं?” यावर विद्यार्थी उत्तर लिहितो, “30 मिली..” त्यावर शिक्षक म्हणतात, “असे ते क्वार्टर नाही…” विद्यार्थ्याच्या उत्तरावर शिक्षकाचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे असतात.

हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सनी यावर मीम्स शेअर करण्यास सुरूवात केलीय. या व्हिडीओमध्ये भन्नाट उत्तर देणारा हा हित्वेक नक्की आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी नेटिझन्स उत्सुक झाले आहेत.

विद्यार्थ्याच्या या भन्नाट उत्तराचा हा व्हिडीओ केवळ ट्विटरवर १.८८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. यावर एका माध्यमाशी बोलताना शिक्षक सीए धवल पुरोहित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवणं हे शिकवण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचं मला वाटतं. पण शिक्षकांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांकडे असे खराब उत्तरं असतातच. पण विद्यार्थ्यांचं उत्तर कसं चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे सांगणं शिक्षकांचं कर्तव्य आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof dhawal purohit asks ek quarter me kitna hota hai student says 30 ml prp