शाळेला दांडी मारण्याची हजार कारणे मुलांकडे तयार असतात. मला बरं वाटत नाही, मी येऊ शकणार नाही, अशी खोटी कारणे देणारेही बरेच असतात. पण एका विद्यार्थिनीनं आपल्या न येण्याचं खरं कारण शिक्षकांना सांगितलं. हाच खरेपणा बहुतेक शिक्षकांना आवडला आणि त्यांनी विद्यार्थिनीच्या या समस्येवर उपायही शोधला.

जॉर्जियात हरिकेन इरमा वादळ धडकेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला होता. या इशाऱ्यामुळं अनेक जण सुरक्षित स्थळी जाण्याचा विचार करत होते. येथील एका मुलीलाही आपल्या आई-वडिलांकडे म्हणजेच अटलांटाला जायचे होते. पण तिला कॉलेजमधला शेवटचा तासही बुडवायचा नव्हता. पण तोपर्यंत तिच्या पाळीव कुत्र्याची देखभाल करायलाही कुणी नव्हतं. ‘काय करावं अन् काय नको’ अशा संभ्रमावस्थेत ती होती. अखेर तिनं शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या प्राध्यापकांना मेल केला. कॉलेजमध्ये पाळीव प्राण्यांना आणण्याची परवानगी मिळणार नाही, याची कल्पना तिला होती. तरीही तिनं प्राध्यापकांना मेल केला.

वाचा : विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेऊन प्राध्यपकांनी दिलं लेक्चर !

‘हरिकेन वादळ धडकण्यापूर्वी मला हे ठिकाण सोडून माझ्या आई-वडिलांकडे जायचे आहे. मला कॉलेजचा शेवटचा तासही बुडवायचा नाही. पण माझ्या कुत्र्याचीही देखभाल करण्यासाठी येथे कुणी नाही. मला माहिती आहे की तुम्ही मला परवानगी देणार नाही, पण माझ्या लाडक्या कुत्र्याला वर्गात बसण्याची परवानगी दिलीत तर बरे होईल. तास संपल्यानंतर आम्हाला लगेच अटलांटासाठी निघता येईल. तुमचा तास संपेपर्यंत कुत्रा दंगा करणार नाही.’ असं तिनं मेलमध्ये नमूद केलं. इतकंच नाही तर आपला कुत्रा किती शांत आणि गुणी आहे हे दाखवण्यासाठी तिनं त्याचे फोटोही मेलसोबत जोडले. कदाचित हाच खरेपणा प्राध्यापकांना भावला आणि त्यांनी कुत्र्याला वर्गात बसण्याची परवानगीही दिली.

Video : बसमधला प्रवास म्हणजे कसरतच, बघा कंडक्टरला काय-काय करावं लागतं!