सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आहे तो टेक्सासमधल्या डॉ. हेन्री मुसोमा या प्राध्यापकाचा. आपल्या विद्यार्थ्यीनींचा तास बुडू नये म्हणून हेन्री यांनी तिच्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन इतर विद्यार्थ्यांना शिकवलं. अॅस्टन रॉबिनसन ही टेक्सासमधल्या ‘ए अँड एम’ विद्यापीठात शिकते. तिला काही महिन्यांचं मुलं आहे. आपल्या छोट्या मुलाला सांभाळत इतर काम करणं म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरतच आहे.

त्यातून आपल्या छोट्या मुलाला सांभाळणारं कोणीच मिळेना म्हणून तिने कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला. ईमेल लिहून तिने प्राध्यापकांना याची माहिती दिली. कदाचित दुसऱ्या एखाद्या प्राध्यापकाने या ईमेलकडे दुर्लक्ष केलं असतं. ही कारणं काय नेहमीचीच आहेत, तिने सुट्टी घेतली तर काय फरक पडतो? असा विचार करून एखाद्याने हा विषय तिथेच सोडून दिला असता. पण प्राध्यापक हेन्रींनी मात्र जे केलं ते कौतुकास्पद होतं. या क्षुल्लक अडचणीमुळे अॅस्टनचा तास बुडू नये, तिचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी मुलाला कॉलेजमध्येच घेऊन यायला सांगितले. तिच्या मुलाला कडेवर उचलून घेत हेन्रीनीं विद्यार्थ्यांना शिकवलं.

वाचा : ‘तो एकेक करून सारी गुपितं उघड करतोय; इराणींनी इन्स्टावर जागवल्या ‘स्मृती’

‘माणूसकी आणि शिक्षणाचं महत्त्व जाणणारा प्राध्यापक मी कुठेच पाहिला नाही. मुलाला सांभाळून शिक्षण घेणं खूप अवघड काम आहे. पण या जगात हेन्रीसारखे प्राध्यापक आहेत आणि त्यांच्यामुळे मी शिकू शकते याचचं मला समाधान आणि आनंद आहे’ अशी प्रतिक्रिया अॅस्टनने दिलीय.

Story img Loader