प्रत्येकालाच मोठ्या पगाराची नोकरी हवी असते. अशी नोकरी मिळवण्यासाठी लोक अनेक त्याग करण्यासाठीही तयार असतात. तसेच, हातात असलेली मोठ्या पगाराची नोकरी टिकवण्यासाठीही लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र एका व्यक्तीने आपल्या नवजात मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडली आहे. अनेकवेळा आईला मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनासाठी नाईलाजाने नोकरी सोडावी लागते. मात्र एका पित्याने स्वइच्छेने हा निर्णय घेतला आहे.

आयआयटी खरगपूर येथील शिक्षण पूर्ण केलेला अंकित जोशी एका कंपनीचा वरिष्ठ उपाध्यक्ष होता. सध्याच्या घडीला एका यशस्वी व्यक्तीकडे जे काही असावे ते सर्व अंकितकडे होते. मात्र आपल्या बाळाच्या जन्मानंतर त्याचे जीवनच बदलले. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधीच त्याने त्याची मोठ्या पगाराची नोकरी सोडली. तो म्हणाला, “मला माहित आहे की माझा हा निर्णय अनेकांना विचित्र वाटला असेल. मात्र माझ्यासाठी हे एक एखाद्या प्रमोशनपेक्षा कमी नाही. अनेकांनी मला चेतावणी दिली की पुढे जाऊन माझ्यासाठी गोष्टी अवघड होतील, मात्र माझ्या पत्नीने माझ्या या निर्णयाला प्रोत्साहन दिले.”

खरा मित्र कसा असावा? अवघ्या चार वाक्यांमध्ये हर्ष गोएंका यांनी सांगितले खऱ्या मैत्रीचे रहस्य

अंकितने सांगितले की सध्या ज्या कंपनीमध्ये तो उपाध्यक्ष म्हणून काम करत होता तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप प्रवास करावा लागत असे. आपल्या मुलीच्या जन्मानंतर तो हा प्रवास करण्यासाठी इच्छुक नव्हता. म्हणूनच त्याने ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अंकितच्या कंपनीने त्याला एक आठवड्याची पितृत्व रजादेखील दिली मात्र यावर तो संतुष्ट नव्हता. त्याने काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर काम सुरु केले असल्याने त्याला कंपनीकडून आणखी काही सवलती मिळू अशी अपेक्षाही नव्हती.

आजीला नवरीच्या वेशात पाहून पुन्हा एकदा प्रेमात पडले आजोबा; अशी रिअ‍ॅक्शन दिली की…; पाहा Viral Video

दरम्यान, नोकरी सोडल्यानंतर अंकितने आपला पूर्ण वेळ पत्नी आणि मुलीच्या देखभालीसाठी समर्पित केला आहे. त्याच्या मुलीचे नाव स्पिती असे आहे. या नावामागचा अर्थ विचारला असता अंकितने सांगितले की या जोडप्याने स्पिती व्हॅलीच्या यात्रा केल्यानंतर ठरवले की या सुंदर जागेच्या नावावर ते आपल्या मुलीचे नाव ठेवतील. पुढील नोकरीबाबत विचारले असता अंकित म्हणाला की काही महिन्यांनंतर तो नवीन नोकरीसाठी अर्ज पाठवण्यास सुरुवात करेल.