थंडीच्या दिवसांमध्ये वाहनांच्या काचांवर लगेच दव जमा होते. कांचावर साठलेले दव काढण्यासाठी लोक विविध उपाय करतात. गाडीच्या काचांवरचे दव काढण्यासाठी कागद वा कारचे वायपर ब्लेड वापरून अथवा वाहनांच्या खिडक्या वर-खाली करणे अशा अनेक पद्धतींचा वापर केला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, आपण वापरत असलेल्या या सर्व पद्धती चुकीच्या आहेत. हो! कारण- वाहनाच्या काचेवर साठलेले दव काढण्याची योग्य पद्धत सांगणारा एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी शेअर केला आहे; जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण हा व्हिडीओ खूप उपयोगी आणि फायदेशीर असल्याचे म्हणत आहेत. तसेच पोलिसांनी माहिती दिल्याबद्दल लोक त्यांचे कौतुकदेखील करीत आहेत. वाहनांच्या काचांवर साठलेले दव काढण्यासाची योग्य पद्धत कोणती आणि दिल्ली पोलिसांनी नेमका काय व्हिडीओ शेअर केला आहे ते पाहू.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही पाहा- बॉसने आजारी असल्याचा पुरावा मागताच संतापला कर्मचारी; थेट व्हॉट्सअ‍ॅपवर राजीनामा पाठवत म्हणाला, “डॉक्टरांकडे जाण्यासाठी…”

असे काढा वाहनांच्या काचांवर साठलेले दव

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अनेक वाहनचालकांना हिवाळ्यात गाडीच्या काचांवर साठलेले दव काढण्यासाठी तुम्ही काय करता, असा प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी लोक वेगवेगळी उत्तरे देतात. कोणी सांगते की, मी कापडानं दव साफ करतो. तर कोणी सांगितले की, मी बराच वेळ कारची काच खाली करून नंतर वरती घेईन. अनेक वाहनचालकांची वेगवेगळी उत्तरे ऐकल्यानंतर त्या सर्व पद्धती चुकीच्या असल्याचं व्हिडीओतील व्यक्ती सांगते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील व्यक्ती कारच्या काचेवर साठलेले दव काढण्यासाठीचा योग्य पर्याय सांगतो. तो सांगितले की, कारमध्ये बसवलेले एसी व्हॅण्ड विंडस्क्रीनवर फिरवावे लागेल आणि एसीचे तापमान हीट मोडवर आणावे लागेल. असे केल्याने तुमच्या वाहनाच्या पुढील स्क्रीनवरून हळूहळू दव निघून जाईल.

दुसरा पर्याय

व्हिडीओत पुढे आणखी एक पर्याय सांगितला आहे; ज्यामध्ये नवीन कारमध्ये मागील विंडस्क्रीनवरील दव काढून टाकण्यासाठी डीफॉगर बटण आहे. त्याचा वापर करून काचेवर साठलेले दव काढता येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. @DelhiPolice च्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओला अनेकांनी तो लाइक केले आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्ली पोलिसांचे आभार मानले असून, त्यांनी दिलेली माहिती लोकांसाठी उपयुक्त असल्याचेही नेटकरी म्हणत आहेत.