सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायलं मिळेल, याबद्दल काहीच सांगता येत नाही. कधीकधी आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्यावर विश्वास ठेवणं थोडं अवघडच होऊन जातं. असाच एक गोंडस व्हिडीओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. यात एका लहान मुलाच्या अनोख्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओल लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसून येतेय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही आतापर्यंत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले असतील किंवा मग लग्नात नवऱ्याने आपल्या होणाऱ्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण जर आम्ही तुम्हाला असं सांगितलंकी, एका लहानश्या चिमुकल्याने महिलेला प्रपोज केलंय, तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. होय, हे खरंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील चिमुकल्याची निरागसता, स्टाईल आणि बोलण्याची पद्धत इतकी अनोखी आहे की लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक महिला खुर्चीवर बसलेली दिसून येतेय. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक उभे आहेत. एक लहान मूलगा आपल्या हातात लाग गुलाबाचं फूल घेऊन येतो आणि ते फूल व्हि़डीओमधील सुंदर महिलेला देतो. या लहान मुलाचं प्रपोजल आधी ही महिला नाकारते. पण मग नंतर या मुलाने जे काही केलं ते फारच मनोरंजक आहे. ज्या स्टाईलमध्ये या मुलाने गुलाबाचं फूल दिलंय ते पाहून सोशल मीडियावरील सर्व मंडळी या चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत.

या चिमुकल्या मुलाची प्रपोज करण्याची अनोखी स्टाईल पाहून आजुबाजुचे लोक फक्त पाहतच राहिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ‘suhail5054khan’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात मोह लोकांना आवरता येत नाहीय.

लाखो लोकांनी या गोंडस मुलाचा व्हिडीओ पाहिला आहे. तर, सुमारे तीन लाख लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘क्या बात है… मुला तू तर कमालच केलीस…’. दुसऱ्या आणखी एका युजरने लिहिले की, ‘छोटा पॅक बिग बँग’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Propose viral video little boy propose woman viral video prp