Father daughter Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत, बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसतं; याचं उदाहरण म्हणून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीनं मेहनतीच्या जोरावर तिच्यासोबतच तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलं आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर या मुलीला आणि तिच्या वडिलांनी तिनं ज्या ॲकेडमीमधून शिक्षण घेतलं, तिथे बोलावण्यात आलं होतं. यावेळी तिथे मुलीबरोबरच वडिलांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मुलीबद्दल बोलताना वडिलांना अश्रू अनावर झाले.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

पोलीस लेकीचं कौतुक करताना अश्रूंचा बांध फुटला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील आणि मुलगी समोर बसली आहे. यावेळी वडिलांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली गेली. तेव्हा वडिलांना मुलीच्या यशाबद्दल, तिच्या मेहनतीबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. आपण घेतलेल्या कष्टाचं मुलीनं चीज केलं याचं समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर यावेळी पाहायला मिळालं. तर वडिलांच्या नजरेत जिंकल्याचा जो आनंद आहे, तो यावेळी या मुलीनेही अनुभवल्याचं पाहायला मिळालं. वडील बोलत असताना तिलाही भरून आलं होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यूचा पाठलाग! आधी दुभाजकाला धडकला, नंतर चार वाहनांना जोरदार धडक; एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर navneet_career_academy नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत, तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “मुलगी वडिलांच्या नजरेत जेव्हा जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते.” वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं.

Story img Loader