Father daughter Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसंत याच उदाहरण म्हणून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. दपरम्यान एका मुलीनं मेहनतीच्या जोरावर तिच्यासोबतच तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलं आहे.लेक पोलीस झाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांसमोर तिच्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट उभे राहतात आणि त्या कष्टांचं चीज मुलीनं केल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसतो. दोघेही बाप-लेक ज्या क्षणाची वाट बघत होते, जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर पूर्ण झालं होतं. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लेक पोलीस झाल्याचं कळताच वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर या मुलीला आणि तिच्या वडिलांनी घट्ट मिठी मारली आहे. यावेळी मुलीबरोबरच वडिलांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. भर रस्त्यात मुलगी आणि वडील भावूक झाले. यावेळी मुलीला वडील समजवताना दिसत आहेत. पण बाप-लेकिचे हे आनंदअश्रू पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीचा लग्नात भन्नाट डान्स; नवरदेवाची रिअॅक्शन एकदा बघाच
“संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो”
आयुष्यभराच्या कष्टाचं फळ मिळाल्याची भावना या व्हिडीओमध्ये वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर psi_mayuri_kalokhe नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला यूजरने “संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो” असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत आणि या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. बापानं कष्ट करावेत आणि पोरांनी त्याचं मोल करावं, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला असून, ते भावूक झाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, बापाच्या कष्टाचं चीज झालं.