यViral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसंत मात्र आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर बघायला तेच नसतील तर? कल्पनाही करवत नाही ना.. पण एका मुलीसोबतच असंच काहीसं घडलंय. ती अधिकारी तर झाली मात्र तीचं हे यश बघण्यासाठी तिचे बाबा या जगात नाहीत. यावेळी माय-लेकीचा एका भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा