Microsoft Job Offers: असं म्हणतात जर तुमच्यात जिद्द असेल तर डोंगराएवढी अडचण सुद्धा तुम्हाला तांदळातील खड्याएवढी वाटते. जर तुमच्यात टॅलेंट असेल तर कोणतीच शारीरिक कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही हे सिद्ध करणाऱ्या एका तरुणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मध्य प्रदेशातील एका २५ वर्षीय यश सोनाकिया याला मायक्रोसॉफ्टकडून सॉफ्टवेअर इंजिनियर पदाची नोकरी ऑफर केलेली आहे. विशेष म्हणजे यश हा आठव्या वर्षांपासून नेत्रहीन आहे. विज्ञानाच्या मदतीने त्याने आजवरचे शिक्षण पूर्ण करून त्याने नुकतीच मायक्रोसॉफ्टमधील नोकरी आपल्या नावे केली आहे. यासाठी यशला तब्ब्ल ४७ लाखांच्या वार्षिक पगाराच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, लवकरच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या बंगळुरू कार्यालयात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू होईल, सुरुवातीला त्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

(Maharashtra Swadhar Yojana: ११वी, १२वी, डिप्लोमा विद्यार्थ्यांना सरकार देणार ५१ हजार, असा करा अर्ज)

यशला जन्मानंतरच काचबिंदूचे निदान झाले होते, अवघ्या आठ वर्षाचा असताना यशने काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमामुळे आपली दृष्टी पूर्णपणे गमावली. मात्र जिद्द न सोडता सोनाकिया कुटुंबाने यशच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली. यशचे वडील यशपाल सोनकिया, हे इंदौरमध्ये उपहारगृह चालवतात. स्क्रीन-रीडर सॉफ्टवेअरच्या मदतीने यश अभ्यास करू लागला. अगदी शाळा- कॉलेजसह बीटेकपर्यंत त्याने याच सॉफ्टवेअरच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले.

२०२१ मध्ये त्याने गोविंदराम सेकसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SGSITS) या सरकारी अनुदानित कॉलेजमधून बीटेक पदवी मिळवली होती सोबतच कोडिंग शिकताना त्याने नोकरीसाठी शोध सुरु केला.

यशला आपल्या कर्तबगारीवर विश्वास होता म्हणूनच त्याने नोकरीसाठी अर्ज करताना मायक्रोसॉफ्टचे ध्येय उराशी धरले होते. अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीनंतर, मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी त्याची निवड करण्यात आली. इतकेच नव्हे तर वार्षिक ४७ लाख रुपयांची मोठी ऑफर सुद्धा यशने मिळवली.