गेल्या वर्षी करोना संकटाच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत भारतानं अनेक चीनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये PUBG चा देखील समावेश होता. मात्र, आता पबजी गेम नव्या अवतारात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. PUBG : New State असं या नव्या अवताराचं नाव असून पुढील महिन्यात ११ नोव्हेंबरला ही गेम २०० देशांमध्ये लाँच केली जाणार आहे. Krafton या कंपनीने ही गेम विकसित केली असून ती अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलमध्ये मोफत खेळता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
क्राफ्टॉन कंपनीने शुक्रवारी यासंदर्भात ऑनलाईन घोषणा केली आहे. PUBG : Battlegrounds हे गेमचं याआधीचं बंदी घालण्यात आलेलं व्हर्जन देखील क्राफ्टॉन कंपनीनेच तयार केलं होतं. लाँचिंगची घोषणा करण्याआधी या गेमची २९-३० ऑक्टोबरपासून २८ देशांमध्ये तांत्रिक चाचणी घेतली जाणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहे नव्या अवतारात?
Krafton नं सांगितल्यानुसार, PUBG : New State हा गेमचा नवा अवतार भविष्यातील २०५१मधल्या परिस्थिती आधारित असेल. यात नवी शस्त्र, गाड्या आणि उच्च दर्जाच्या ग्राफीक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही गेम एकूण १७ विविध भाषांमध्ये लाँच केली जाणार आहे. लाँच झाल्यानंतर या गेममध्ये चार प्रकारचे युनिक मॅप असणार आहेत. यामध्ये Troi, Erangel यांचा समावेश असेल.
Dyneema आर्मरचा समावेश
पबजीच्या या नव्या अवतारामध्ये Dyneema या नव्या आर्मरचा समावेश करण्यात आल्याचं क्राफ्टॉनकडून सांगण्यात आलं आहे. हे आर्मर खेळणाऱ्याला ५.५६ एमएम, ९ एमएम आणि ०.४५ एसीपी या शस्त्रांपासून संरक्षण देऊ शकणार आहे. मात्र, त्याचवेळी हे आर्मर ७.६२ एमम, ३०० मॅग्नम आणि १२ गॉजसमोर कमकुवत ठरणार आहे.
The Volta, Vulture गाड्यांचा थरार!
दरम्यान, नव्या गेममध्ये The Volta ही कार आणि Vulture या बाईकचा समावेश करण्यात आला आहे. हल्ल्यांना निष्प्रभ करण्याची क्षमता या गाड्यांमध्ये असेल. खेळाडूंना The Drone Shop चा देखील पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. यातून गेममध्ये तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तू ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकणार आहेत.