Pune grandmother’s first metro ride : बहुप्रतिक्षित स्वारगेट मेट्रो स्टेशन अखेर पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले. मेट्रो सुरु झाल्यापासून पुणेकरांनी नव्या मेट्रो स्टेशनला भेट दिली आणि मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. अशाच मेट्रो प्रवास करणाऱ्या एका पुणेरी आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजींनी पहिल्यांदा पुण्यातील मेट्रोने एकटीने प्रवास केला. आजींच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

पुणेरी आजींचा पहिला मेट्रो प्रवास

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गावर मेट्रो सुरु झाल्यापासून अनेक उत्साही पुणेकर मेट्रो प्रवासाचा आनंद घेत आहे. अशाच एका उत्साही आजींचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये आजींनी आपला मेट्रो प्रवास कसा होता हे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की,”मस्तं वाटतंय. मी पहिल्यांदा मेट्रोने प्रवास केला. मंडईच्या बसस्टॉपला उभे होते तेव्हा लोक म्हणाले जा आजी मेट्रोने त्यामुळे मी आले इथे. खूप छान, सुंदर. म्हणजे मी पुण्यात आहे पुण्यातील मंडईत आहे असे वाटतंच नाहीये. सोयी सुविधा छान आहे. वातावरण खूप छान आहे. पुण्यात आहे की परदेशात आहे हेच कळतं नाहीये.”

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – लेकीचं प्रेम! बाबाला नवीन नोकरी मिळाल्यानंतर चिमुकलीला झाला आनंद; ह्रदयस्पर्शी Video एकदा बघाच

येथे पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांना प्रचंड आवडला व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर chafa__bole_na नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” पुण्यात नुकतीच स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मार्गावर मेट्रो सुरू झाली. रस्त्यावरची गर्दी, ट्रॅफिक सर्व काही टाळून पुण्याच्या पोटातून शांतपणे धावणारी मेट्रो पाहण्यासाठी उत्साही पुणेकर भेट देत आहे. अशाच एक उत्साही आजींनी पहिल्यांदा पुण्यातील मेट्रोने प्रवास केला. आजींनी स्वतःचा मेट्रो मध्ये छान फोटो काढला, मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ केला. आजींना तर आपण पुण्यात नाही परदेशात आहोत असे वाटत होते…त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.”

हेही वाचा –“ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली…”, गोष्ट नव्हे प्रत्यक्षात रंगली शर्यत; कोण जिंकले ते पाहा Viral Videoमध्ये

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की,”आजींची (मेट्रो) सफर, एकदम जबर”

दुसऱ्याने कमेंट केली की, “व्वा खूपचं मस्त! प्रवासाचा आनंद आजींच्या चेहऱ्यावर १०० टक्के दिसत आहे.”

Story img Loader