Pune accident video: तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका कुटुंबानं खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.
घटना पुणे-बंगळुरू एक्सप्रेस हायवेवरील कणेरीवाडी फाटा येथे घडली. पुण्यातील असून एक कार रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात समोरून एक छोटा मालवाहतूक करणारा ट्रक आला. या ट्रकमधून बाहेर आलेल्या लोखंडी रॉड्स थेट कारच्या विंडशील्डवर आदळून आतमध्ये शिरल्या. सळ्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि कारच्या आतील भागापर्यंत घुसल्या.पुण्यातील कार अपघाताचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होतं. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. खरं तर हा अपघात इतका गंभीर होता की चालकाचा मृत्यूदेखील होऊ शकला असता. पण नशिबाने सर्वांचे प्राण वाचले. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.
हा व्हिडीओ पाहून सर्वच अवाक् झाले असून या अपघातानंतर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @CameramanTarun नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”