Ajit Pawar Sunetra Pawar: सध्या सर्वच राजकारण हे अजित पवार यांच्याभोवती केंद्रस्थानी असल्याचे दिसून येतंय. मात्र घरातील केंद्रबिंदू असणाऱ्या अजित पवार यांच्या पत्नी सध्या चर्चेत आल्या आहेत. पुणे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात होत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी राजकीय प्रवेशावर भाष्य करताना दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर मी आहेच, असं म्हटलं होतं. तर, आता सुनेत्रा पवार याही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रीय झाल्याचं दिसून येतंय. पुण्यात मंगळागौर निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांसाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
कोणत्या कार्यक्रमात घेतला उखाणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भन्नाट उखाणा घेतला आहे. पुणे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात होत आहे. पुण्यातील मंगळागौर कार्यक्रमात पती अजित पवार यांची आठवण करत सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात हा कार्यक्रम भरवला होता. याच कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उखाणा घेतला.
सुनेत्रा पवार यांचा उखाणा
गणपतीला वाहते दुर्वा,
पांडुरंगाला वाहते तुळशी,
अजितरावांचे नाव घेते..
राष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी. असा उखाणा सुनेत्रा पवार यांनी घेतला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Viral Photo: भूगोलाच्या परीक्षेत विद्यार्थी जोमात, उत्तर वाचून शिक्षक कोमात; पाचवीच्या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल
दरम्यान हाच उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या माध्यमातून तो सर्वदूर पोहोचला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शेअर करत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमातच हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यावेळी, उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.