Pune among top 10 world cities with most congested roads : पुणे तेथे काय उणे असे नेहमीच म्हटल्या जाते. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असतांना आता पुण्याला पुन्हा नवी ओळख निर्माण झाली आहे. पुण्याने जगातील सर्वाधिक दाटीवाटीचे आणि छोटे रस्ते असल्याच्या शहऱ्यांच्या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत बंगळुरू शहराचा ६ वा क्रमांक आहे.

सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुण्याचा कितवी नंबर?

टॉम टॉम अहवाल २०२३ प्रसिद्ध झाला असून यात ही माहिती उघड झाली आहे. पुण्याने जगातील पहिल्या सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी वेळ हा २७ मिनिटे आणि ५० सेकंद लागत होता. यात आत वाढ झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली, गर्दीत ४४ व्या क्रमांकावर आहे, दिल्लीत १० किमीचे अंतर कापण्यासाठी सुमारे २१ मिनिटे आणि ४० सेकंद लागतात अंतर तर मुंबईत हेच अंतर कापण्यासाठी सरासरी २१ मिनिटे आणि २० सेकंदांचा कालावधी लागत असल्याने प्रवासाच्या वेळेसह मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे.

गर्दीमुळे किती तास वाया गेले

२०२३ च्या टॉमटॉम अहवालानुसार, पुण्यातील एका प्रवाशाने गर्दीच्या वेळी सरासरी २५६ तास ड्रायव्हिंग केले. वाहतूक कोंडीमुळे त्याचे तब्बल १२८ तास वाया गेले. यामुळे अंदाजे १ हजार ७ किलो कार्बनचे उत्सर्जंन झाले झाले. त्यापैकी १६५ किलो हा पुण्यातील गर्दीमुळे उत्सर्जित झाला. पुणेकरांनी किमान एक दिवस जरी घरातून काम केले तर त्यातून वर्षभरात मोठा फायदा होणार आहे. पुणेकरांनी दर शुक्रवारी घरून काम केले तर त्यातून त्यांचा सरासरी १० किलोमीटरचा वाहन प्रवास टळणार आहे. त्यातून प्रत्येक पुणेकराची वर्षाला ५१ तासांची बचत होणार असून, त्यातून प्रत्येकी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन २०० किलोने कमी होईल. हेच घरून काम बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस केल्यास त्यातून प्रत्येक पुणेकराची १५४ तासांची बचत होईल आणि त्यातून प्रत्येकी ५९९ किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल.

नवी दिल्लीतील प्रवाशांनी १९१ तास, मुंबई १९८ तास आणि बंगळुरू २५७ तास पीक अवर्समध्ये ड्रायव्हिंग केले. यात त्यांनी अनुक्रमे ८१, ९२ आणि १३२ तास वाहतुकी कोंडीत गमावले.

हेही वाचा >> Pune Video : पुण्यातील १३५ वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव खाल्ला का? एकदा VIDEO पाहाच

५५ देशांमधील ३८७ शहरांमध्ये केलेल्या या अभ्यासात लंडन हे सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून आढळले. १० मिनिटांच्या प्रवासाठी ३७ मिनिटे आणि २० सेकंद लागत होते. लंडननंतर डब्लिन येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिटे लागत. तर टोरंटो येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिट ३० सेकंद लागतात.