इंडिगोच्या पायलटने अलीकडेच पुणे-बेंगळुरू विमाण उड्डाण करण्यास नकार दिला, कारण त्याचे ड्युटीचे तास संपले आहेत आणि त्यामुळे फ्लाइट 6E 361 ला ५ तास उशीर झाला. हे फ्लाइट, मूलतः १२.४५ वाजता निघणार होते, शेवटी ५.४४ वाजता उड्डाण केले आणि सकाळी ६.४९ वाजता बंगळुरूमध्ये उतरल. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती, परंतु एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी पायलट आणि इंडिगो क्रू यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेकांनी प्रवाशांचे समर्थन केले आणि पायलटचा बचाव केला आणि इंडिगोच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरण्याची मागणी केली.

पायलटने दिले विमान उड्डाणास नकार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटने सांगितले की,”विमान उड्डान करताना त्याच्या कामाच्या तासांपेक्षा जास्त वेळ त्याला काम करावे लागणार होते. कामाचे तास संपल्यानंतर त्याने विमान उड्डान करण्यास नकार दिला. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी जेव्हा प्रवाशांनी पायलटला बोलावले तेव्हा त्याने पायलट कॉकपिटचा दरवाजा बंद केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी अत्यंत वैतागलेले दिसत आहे.

पुणे-बंगळुरू इंडिगो फ्लाइला ५ तास उशीर

अनेक प्रवाशांनी इंडिगोच्या प्रवासाबद्दल एक्सवर नाराजी व्यक्त केली. लोकेश एमके या प्रवाशाने X वर पोस्ट केले, “@MoCA_GoI इंडिगो फ्लाइटला पुणे विमानतळ फ्लाइट क्रमांक 6E0 361 वर पुण्याहून बेंगळुरूला ३ तास उशीर होत आहे आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कृपया त्वरित मदत करा”

दुसरा प्रवासी आयुष कुमार याने X वर प्रवाशांचा संताप दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांचे ट्विट असे लिहिले आहे की, “पायलटने कामाचे तास संपल्यामुळे टेक ऑफ करण्यास नकार दिल्याने पुण्याहून बेंगळुरूला जाणारी इंडिगोची फ्लाइट 6Eला उड्डाणास ५ तास उशीर झाला. प्रवाश्यांना नाष्टा, कोणतीही भरपाई न मिळाल्याने ते अडकून पडले. ग्राहक सेवेकडे पूर्ण दुर्लक्ष. याची परवानगी कशी देता येईल? @IndiGo6E @DGCAIndia.”

हेही वाचा –गरुडाची तीक्ष्ण नजर पाहून आनंद महिंद्रा यांना मिळाली प्रेरणा! Video शेअर करत म्हणाले, “लक्ष्य….”

हेही वाचा – पुणेरी आजीनंतर आता पुणेरी आजोबांचा Video Viral! “काठी न घोंगड घेऊ द्या की रं” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स

वादाला उत्तर देताना IndiGo ने उड्डानाला विलंब झाल्याची खात्री केली आणि ३० सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी केले, “२४सप्टेंबर २०२४ रोजी पुणे ते बेंगळुरूला जाणारी फ्लाइट 6E 361, फ्लाइट ड्युटी वेळेच्या मर्यादांशी संबंधित ऑपरेशनल कारणांमुळे उशीर झाला. ग्राहकांना विलंबाबद्दल माहिती देण्यात येत होती आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी आमची टीम संपूर्ण कालावधीत तिथे उपलब्ध होती. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत.”