Pune Boy Commits Suicide For Online Game: गेम टास्क पूर्ण करण्यासाठी एका १६ वर्षीय मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुण्यात घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या तरुणाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गेम टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात त्याने लॉग ऑफ नोट असे म्हटले होते.

लॉग ऑफ नोट (Pune Boy Jumps To Death)

जेव्हा तुम्ही संगणकावर काम संपवून तो बंद करता, तेव्हा त्याला ‘लॉग ऑफ’ म्हणतात. साधारणपणे हे संगणकीय भाषेत केले जाते. याच संगणकीय भाषेचा वापर करत मुलाने वहीवर लॉग ऑफ नोट लिहिली. या लॉग ऑफ नोटने कुटुंबीय आणि पोलिसदेखील हादरले. कारण त्या मुलाने ऑनलाइन गेम खेळत असताना हे धोकादायक पाऊल उचलले.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
school boy suicide news
शालेय साहित्य न मिळाल्याने मुलाची आत्महत्या; पित्यानेही संपवले जीवन
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!

वहीवर काढलेल्या रेषांमुळे पोलिस गोंधळात

आत्महत्येचे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी मुलाने त्याच्या वहीवर काही रेषा काढल्या होत्या, त्या रेषा पाहून आता पोलिसदेखील गोंधळात पडले आहेत. मुलाने त्याच्या वहीवर काढलेल्या स्केचेस आणि नकाशावरून पोलिसांना आतापर्यंत फक्त एकच अंदाज लावता आला आहे की, हा मल्टिप्लेअर कॉम्बॅट गेमसाठी स्ट्रॅटेजी मॅप आहे.

त्याच्या वहीमध्ये पोलिसांना अनेक रेखाचित्रे आणि नकाशेही सापडले आहेत. त्याला ऑनलाइन गेमचे व्यसन होते, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण, अद्याप मुलाच्या लॅपटॉपचा पासवर्ड कळलेला नाही, यामुळे लॅपटॉपचा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पोलिसांना त्याच्या वहीत गेमच्या कोडिंग भाषेत लिहिलेले इतर अनेक कागदही सापडले आहेत.

सध्या पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून गेमचा तपास सुरू केला आहे. गेमचे निर्माते आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सोसायटीच्या ग्रुपवरील मेसेजवरुन समजली मुलाच्या मृत्यूची बातमी

पिंपरी चिंचवडमधील किवळे परिसरात २६ जुलै रोजी रात्री किवळे येथील उच्चभ्रू हाउसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली.१६ वर्षीय उमेश त्याची आई आणि लहान भावासह येथे राहत होता, तर वडील नायजेरियात काम करतात. आईने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलाला सहा महिन्यांपासून गेमचे व्यसन होते. खाणेपिणे विसरून तो तासनतास स्वतःला खोलीत कोंडून ठेवायचा. एकटा राहायचा, एकटाच बडबड करायचा.

आईने पुढे म्हटले की, २५ जुलै रोजी तो जेवायला बाहेर पडला आणि नंतर परत खोलीत गेला. माझ्या लहान मुलाला ताप आला होता, म्हणून मी त्याच्यासोबत होते. यावेळी मध्यरात्रीनंतर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला की, एक मुलगा इमारतीवरून खाली पडला, जो वाचून मी रूममध्ये गेले, पण उमेश तिथे नव्हता. त्यानंतर मी खाली धाव घेतली, तर उमेश पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

आश्चर्याची बाब म्हणजे उमेशच्या रुममध्ये इमारतीचे तीन डिझाइन सापडले आहेत. यातील एका नकाशात सांगितले होते की, आत्महत्या कशी करावी? पोलिस आता त्याचा तपास करत आहेत.

गेमद्वारे पूर्ण करत होता आत्महत्येचा टास्क

मुलाच्या आईने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत तिच्या मुलाचे वागणे खूप बदलले होते. त्याचं हे वागणं त्याच्या कुटुंबीयांसाठीही फार धक्का होता. तो दिवसेंदिवस चिडखोर आणि निडर होत होता. अनेकदा तो आगीशी खेळताना तर काहीवेळा चाकूने काहीतरी करताना पाहून कुटुंबीयदेखील घाबरले. त्याच्या आधी जो कोणी या गेममध्ये सामील झाला होता, त्याने मुलाला गेमद्वारे आत्महत्या करण्याचा टास्क दिला असा पोलिसांचा अंदाज आहे.

मृत मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया

मृत मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, लॅपटॉपला पॅरेंटल लॉक होते, जो मुलगा बायपास करत असे. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा अभ्यासात चांगला होता. परंतु, त्याने त्याच्या लॅपटॉपची हिस्ट्री डिलीट करून आणि अनेक ईमेल अकाउंट्सच्या माध्यमातून त्याने त्याची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी लपवण्यास सुरुवात केली होती. वडिलांनी असेही सांगितले की, त्याच्या वहीमध्ये काही रेखाचित्रे होती, ज्यावरून तो एका टीम गेममध्ये सहभागी होता असे दिसून आले. तो ब्लू व्हेल गेमसारखाच आहे.

चाकू अन् आगीशी खेळायचा

गेल्या सहा महिन्यांपासून मुलामध्ये बरेच बदल झाल्याचे या मुलाचे वडील सांगतात. तो टरबूज सुरीने अगदी बारीक कापायचा आणि आगीशी खेळत राहायचा. त्याच्या शाळेत आणि तिथल्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यायचा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो स्वतः ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलाच्या मामानेच ही माहिती पोलिसांना दिली.

Story img Loader