आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भजन-भक्तिगीत म्हणत पायी पंढरपूरला म्हणजेच वारीला जात आहेत.
एक दिवस पुण्यात विश्रांती घेतल्यानंतर वारी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. लाखो वारकऱ्यांचा वारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : रसगुल्ला भरवणे पडले महागात, नवरदेवाला भर मांडवात नवरीने चोपले!
या व्हिडीओत लाखो वारकरी तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ दूरवरून शूट केला आहे. मनमोहक निसर्गरम्य वातावरणात वारकऱ्यांची मोठी रांग लक्ष वेधून घेणारी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ आहे.
पुणे शहर पोलीस यांच्या अधिकृत @PuneCityPolice या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पाऊले चालती पंढरीची वाट…” श्री क्षेत्र पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले वेगाने मार्गक्रमण करीत आहेत. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वैष्णवांचा मेळा एक-एक टप्पा पार करीत भक्तिनामात तल्लीन झाला आहे.”
हेही वाचा : Optical Illusion : हत्तीला नेमके किती पाय आहेत? आजवर कोणीही सोडवू शकले नाही हे कोडे? एकदा क्लिक करून पाहा
या व्हिडीओवर अनेक विठ्ठल भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर हजारो व्ह्यूज आले असून अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.