SUVs Racing Inside Wagholi Society Viral Video :वाहतूक नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जाते. वाहतूक नियम पाळण्याचे गांभीर्य सोडा पण इतरांच्या जीवाची पर्वा देखील करत नाही. नुकताच बंगळुरूमध्ये मद्यपान करून काही तरुणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. कारवर उभे राहून नाचले, मद्यपान करून भरधाव वेगात धोकादायरित्या कार चालवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. स्थानिक पोलिस त्या तरुणांचा शोध घेत आहे दरम्यान पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आहे. पुण्यातील वाघोली परिसरतील एका सोसायटीमध्ये भरदिवसा भरधाव वेगाने शर्यत लावणाऱ्या दोन एसयूव्ही गाड्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पुणे पोलिसांनी या कार ताब्यात घेतल्या आहेत.

सोसायटीत सुसाट वेगात दोन कारची बेकायदेशीर शर्यत (Illegal race between two cars at high speed in society)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वाघोली येथील न्याती एलन सोसायटीमध्ये महिंद्रा थार आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन एसयूव्ही पूर्ण वेगाने धावताना दिसल्या, ज्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सोसायटीच्या परिसरामध्ये काळ्या रंगाच्या एसयूव्ही कशा प्रकारे भरधाव वेगाने धावत आहे. त्यांना स्वत:च्या जीवाची आणि इतरांच्या जीवाची देखील पर्वा नाही. एवढेच नाही तर या तरुणांनी सोसायटीतील लोकांबरोबरी गैरवर्तन केले.

पुणे पोलिसांचे ट्विट

याबाबत पुणे पोलिसांनी गुरुवारी एक्स (पूर्वी ट्विटर) वर घोषणा केली की, वाघोली येथील एका निवासी सोसायटीमध्ये कारची शर्यत लावताना आढळल्यानंतर त्यांनी दोन एसयूव्ही जप्त केल्या आहेत आणि त्यांच्या मालकांवर कारवाई सुरू केली आहे.

व्हिडिओ पहा:

काय म्हणाले पोलिस? (What did the police say?)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वाघोली येथील न्याती एलन सोसायटीमध्ये महिंद्रा थार आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन एसयूव्ही भरधाव वेगाने धावताना दिसल्या, ज्यामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आला. रहिवाशांनी त्यांना थांबवले तेव्हा दोन्ही चालकांनी त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याव्यतिरिक्त, सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत दोन्ही एसयूव्ही जप्त केल्या आणि त्यांच्या मालकांवर कारवाई सुरू केली.

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर केले पोलिसांचे कौतुक (Netizens praised the police on the video)

एकाने कमेंट केली की, “पुणे पोलिसांचा विजय असो”

दुसऱ्याने कमेट केली की,”उत्तम कामगिरी केली.”

तिसऱ्याने कमेंट केली की, “चांगली कामगिरी केली. आता यांच्या गाड्या कायमच्या जप्त करा.