Viral photo: आपण डॉक्टरांकडे गेलो की ते आपल्याला औषधाची चिठ्ठी लिहून दितात, ज्याला आपण प्रिस्किप्शन म्हणतो. हे घेऊन रुग्ण मेडिकल स्टोअरवाल्यांकडे जातात आणि त्यानुसार त्यांना औषध मिळतात. तसे पाहाता डॉक्टरचं प्रिस्किप्शन आणि अक्षर हे सामान्य लोकांना कळतच नाही. पण वाचण्याचा प्रयत्न केला तर थोडं फार लॉजिक लावून आपण ते वाचू शकतो. पण एका डॉक्टरनं असं प्रिस्क्रिप्शन दिलंय की ते थेट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर नेमकं काय लिहिलेलं असतं, हे केमिस्टशिवाय कुणीही सांगू शकणार नाही, असं गमतीने म्हणतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका प्रिस्क्रिप्शने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे प्रिस्क्रिप्शन पुण्यातल्या एका डॉक्टरनं दिलंय त्यामुळे हे असंच असणार अशी खिल्ली नेटकरी उडवत आहेत. तुम्हीही हे प्रिस्क्रिप्शन वाचून पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं लिहिलंय तरी काय?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं लिहिलंय तरी काय? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला विशिष्ट गोळ्या लिहून देतात सोबतच त्या गोळ्या कशा आणि कधी खायच्या तसेच किती दिवस खायच्या हे सांगतात लिहून देतात. मात्र या डॉक्टरांनी कधीपर्यंत खायच्या असा प्रश्न विचारला असता प्रिस्क्रिप्शनवर असं काही लिहिलं की याचा कुणी विचारही नाही करु शकत. या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर “या दोन प्रकारच्या गोळ्या पांडुरंगचरी विलीन होईपर्यंत घेत राहणे” असं लिहिलं आहे. यानंतर याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात आता डॉक्टरांचाही समावेश झाला आहे.

पाहा फोटो

सोशल मीडियावर हा फोटो fakt_marathi_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, पेशंट घाबरूनच जाईल पांडुरंगाकडे तर आणखी एकानं लिहिलंय शेवटी डॉक्टर पुण्याचा आहे हे विसरु नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune doctor funny medicine prescription viral on social media srk