Pune Viral video: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. इंटरनेटवर अनेक स्टंट व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोण काय स्टंट करेल याचा काही नेम नाही. अनेक मजेशीर, धोकादायक, विचित्र स्टंट व्हिडीओ पाहायला मिळतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. मात्र, समोर आलेला हा व्हिडीओ स्टंटबाजीचा नाही तर काहीतरी अजबच प्रकार आहे. कारण रविवारी हडपसर परिसरामध्ये चक्क विनाचालक पुणे महानगरपालिकेची गाडी रस्त्यावर उलट्या दिशेने धावताना दिसली. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही ‘पुणे तिथे काय उणे’ अशा प्रतिक्रिया देत आहेत.

पुणे तिथे काय उणे

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

गेल्या काही दिवसांपासून पुणे अनेक अपघातांमुळे सतत चर्चेत आहे. आता पुण्यातून अजून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका वर्दळीच्या महामार्गावर एक टेम्पो, चक्क चालक नसताना उलट्या दिशेने भरधाव जाताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी, ४ ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील वैदूवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री हा प्रकार समोर आला. सुदैवाने मागून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला.

चक्क विना ड्रायव्हर धावली गाडी

व्हायरल व्हिडीओमध्ये गाडीच्या सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र असल्या भयानक प्रकारामुळे पुण्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुण्यात लेडीज सीटवरून वाद, महिलेनं हात उचलताच पुरुषही आक्रमक; तुम्हीच सांगा या प्रकारात चूक कुणाची?

नेटकरी संतापले

हा व्हिडीओ सोशल मीडियावर punerifeeds नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत टीकाही करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीही आम्हाला कमेंट करून कळवा. तर एकानं कमेंट केली आहे की, “हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. “

Story img Loader