‘पास्ता’ आणि ‘बिर्याणी’ हे कॉम्बिनेशन ऐकायला कसं वाटतंय? फारच विचित्र की खूपच इंट्रेस्टिंग? असाच काहीसा संमिश्र प्रतिसाद सोशल मीडियावर पाहायला मिळाला जेव्हा पुण्यातील एका आऊटलेटनं ‘पास्ता बिर्याणी’ नावाच्या नव्या पदार्थाला आपल्या मेन्यू कार्डमध्ये जागा दिली. आता बिर्याणी या पदार्थाशी आपल्या भारतीयांची किती घट्ट भावना जोडल्या आहेत हे वेगळं सांगायला नको. बिर्याणी तर आपली शान आहे, अगदी जंगी दावतपासून ते प्रचारापर्यंतच्या अनेक गोष्टीत बिर्याणी नसेल तर मज्जा नाही बॉस!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वेगवेगळ्या मसाल्यात मॅरिनेट केलेलं चिकनं, सुगंधी आणि लांब बासमती तांदूळ, तिचं ‘शाही’पण वाढवण्यासाठी त्यात घातलेला सुकामेवा आणि केशर.. नुसतं वर्णन ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं.. तर या साचेबद्ध बिर्याणीची जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली पाककृती आहे त्यात ढवळाढवळ करून जर कोणी चिकनऐवजी पास्ता वगैरे टाकत असेल तर ‘कट्टर फूडीं’ना हे थोडीच रुचणार आहे म्हणा! तेव्हा ‘पास्ता बिर्याणी’ नावाचा प्रकार जगाच्या पाठीवर अस्तित्त्वात आहे म्हटल्यावर बिर्याणी प्रेमी शांत थोडंच बसणार? त्यामुळे पुण्याच्या फूड फॅक्टरीच्या व्हायरल झालेल्या बिर्याणीच्या फोटोवर अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही आल्यात. त्यातल्या अनेकांनी तर या बिर्याणीची चव चाखूनही पाहिली नसेल पण नुसतं नाव वाचूनच त्यांनी ही बिर्याणी काही चवीला ठीक नसणार असं गृहीतच धरलंय जणू.

पण काही आहेत ज्यांनी या नव्या ‘अविष्कारा’चं स्वागतही केलंय. शेवटी किती दिवस तेच तेच खायचं. कधीतरी जीभचे चोचले पुरवायला काहीतरी वेगळं चाखून पाहायला हवंच ना! तेव्हा काहींनी याचं स्वागतही केलंय. आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळालेली ही पास्ता बिर्याणी ‘हैदराबादी बिर्याणी’, ‘लखनवी बिर्याणी’, ‘मुघलई बिर्याणी’ या बिर्याणींच्या यादीत स्थान मिळवायला कितपत यशस्वी होतेय हे पाहण्यासारखं ठरेल.