25 kg Gold in Tirumala Temple: आंध्र प्रदेशमधील तिरूपती देवस्थानाला दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक भेट देत असतात. यावेळी देवस्थानाला भाविकांकडून देण्यात येणाऱ्या दानाची रक्कम काही कोटींमध्येही गेल्याचं पाहायला मिळालं आहे. पण एक कुटुंब चक्क कोट्यवधींचं सोनं अंगावर घालून तिरुपती देवस्थानात दर्शनासाठी गेल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेनं शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. हे कुटुंब पुण्यातलं असल्याचंही पीटीआयच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

पीटीआयनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओसह त्याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. व्हिडीओतील पुणेकर कुटुंब तब्बल २५ किलो सोनं अंगावर घालून तिरुपती देवस्थानला दर्शनासाठी पोहोचल्याचं त्यात म्हटलं आहे. हा व्हिडीओ २३ ऑगस्ट रोजी पोस्ट झाला असून त्याच दिवशी हे कुटुंब दर्शनासाठी तिरुपती देवस्थानला गेल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Kolkata Murder Case
Kolkata Rape Case : गळ्यात ब्लुटूथ घालून आरोपीचा रुग्णालयात प्रवेश; तपासादरम्यान महत्त्वाचे CCTV फुटेज हाती!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Goa, citizens Goa angry, Impact of tourism,
गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
Assam minor gangrape case
Assam Minor Gangrape Case : आसाम सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, पोलीस म्हणाले, “घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने…”

या व्हिडीओमध्ये दोन पुरुष, एक महिला व एक लहान मूल दिसत आहेत. पुरुषांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे भरगच्च दागिने दिसत आहेत. त्याचवेळी त्यांच्यासह चालणाऱ्या महिलेच्या अंगावरही अनेक सोन्याचे दागिने आहेत. एका व्यक्तीच्या गळ्यात इंग्रजीत 7 क्रमांकाची साखळी असून दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात ‘नाना’ असं लिहिलेली साखळी दिसत आहे. या सोन्याचं वजन जवळपास २५ किलो असून त्याची किंमत तब्बल १८ कोटींच्या घरात असल्याचंही सांगितलं जात आहे.

सुरक्षारक्षकांच्या संरक्षणात मंदिरात

दरम्यान, या कुटुंबासमवेत दोन सुरक्षारक्षक असून त्यांच्या संरक्षणात हे सर्व सोनं घातलेले कुटुंबीय मंदिरात जाताना दिसत आहे. त्याशिवाय एक पोलीस कर्मचारीही त्यांच्यासमवेत दिसत आहे.

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं तिरुपती येथे देवदर्शन, शेअर केले खास Photos

जुलै महिन्यात तिरुपती देवस्थानाला जवळपास २२ लाख भाविकांनी भेट दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय, मंदिराकडून तब्बल १ कोटी प्रसादाच्या लाडूंची विक्री करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. दररोज मंदिरात ७५ हजार ते ९० हजार भाविक दर्शनासाठी येतात असा अंदाज आहे.