Viral video: भारतातील मोठी लोकसंख्या आजही उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. मात्र अनेक भारतीय शेतकरी अजूनही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे पीक उत्पादन कमी प्रमाणात हाती येतं. कमी पीक उत्पादनाची इतर कारणंही असू शकतात. मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय त्रासदायक समस्या म्हणजे पक्षी, वन्यप्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी. पक्षी आणि प्राण्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान हा पीक उत्पादनातला मोठा अडथळा आहे. मात्र पक्ष्यांना, प्राण्यांना पिकांवर हल्ला करण्यापासून रोखणं हे जिकीरीचं काम आहे. यासाठी उपलब्ध असणारी उपकरणंदेखील महाग आहेत. तुम्हीही याच त्रासातून जात असाल तर आता टेंशन घेऊ नका कारण एका पुणेरी शेतकऱ्यानं एक रुपयाही खर्च न करता पिकांवरील पक्षी पळवण्यासाठी भन्नाट जुगाड केला आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल पुणेकरांचा नादच नाही बुवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत.यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या पुणेरी शेतकऱ्यानं ज्वारीच्या पिकांवर बसणाऱ्या पक्ष्यांपासून पिकांचं सरंक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड केलाय. आ शेतकऱ्यानं पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पिकांच्या टोकावर लावल्या आहे. यावळी जेव्हा वारा येतो तेव्हा त्या बाटल्या एकमेकांवर आदळतात आणि त्या आवाजाने पक्षी पिकांकडे येतच नाही.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय.

पाहा व्हिडीओ

शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून पिकं उभी करतात आणि डुक्करांसारखे प्राणी येऊन ही सगळी मेहनत उध्वस्त करतात. शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात, अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video srk