Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरातील १४ आठवड्यांचा प्रवास आज संपणार असून यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यातच आता पुणेकरांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरवला आहे. पुण्यातील एफ.सी रोडवरील एका कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कारवर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या विजेत्याचं पोस्टर लावलं आहे. हे पोस्टर पाहून सगळेच पुणेकर थांबत असून सगळ्यांनीच याला दुजोरा दिला आहे.

पुणेकरांनी बिग बॉसचा विजेता ठरवला!

आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेवर लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन प्रचंड गाजला. बिग बॉसची थीम, घरातील सदस्य ते होस्ट रितेश देशमुख या सर्वांनाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. अशातच पुणेकरांनी कोणाला पसंती दिलीय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल. तर पुणेकरांनी बिग बॉस मराठीच्या घरातील रिल्स स्टार सूरज चव्हाणला पसंती दिली आहे. एवढचं नाहीतर पुणेकरांनी सुरज बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता आहे हे ठरवूनच टाकलंय.

पाहा कोण होणार विजेता

पुण्यातल्या एफ.सी रोडवर एका कारवर सुरज चव्हाणचा विजेता म्हणून पोस्टर लावलं असून त्यावर बाई काय हा प्रकार SQ, RQ, ZQ WINNER असं लिहलं आहे. तसेच सुरजला वोट करण्याचं आवाहनही केलं आहे. हे पासून सगळेच रस्त्यावर थांबू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळे तरुण या कारकडे बघून हो सुरज चव्हाणच विजेता आहे अशी प्रतिक्रिया देत फोटो व्हिडीओ काढत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पैठणीसाठी काही पण! कोल्हापुरात पैठणीसाठी बायकांमध्ये राडा; होम मिनिस्टर स्पर्धेतील VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ raj_shinde6666 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही भरभरुन कमेंट करत सुरजला प्रेम देत आहेत. एकानं कमेंट केलीय की, “बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणच” आणखी काही कमेंट पुढील प्रमाणे, खूप छान वाटतं एका गरीब मुलाला सपोर्ट करताय हे बघुन” “एखाद्याला ग्राऊंड लेव्हलला येऊन सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे.