Pune Fire Shocking Video : देवपूजा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण देवाचा दिवा लावताना एका ठिणगीनेही आगीचा भडका उडू शकतो, त्यामुळे देव्हाऱ्याशेजारी कपडे किंवा इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नका असे सांगितले जाते. कारण अशा अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. सध्या पुण्यातून अशाच एका भीषण घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात देवपूजा करताना झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण घराने पेट घातल्याचे दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवपूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो. अनेक जण घरात अगरबत्ती, धूप लावतात. पण, यावेळी धूपातील आगीचे कण घरात तर कुठे उडत नाहीत ना हे पाहावे लागते. कारण यातील आगीच्या एका ठिणगीनेही भीषण घटना घडू शकते. पुण्यात अशाप्रकारे एका घरात देवासमोर धूप लावताना एक चूक झाली आणि ज्यात संपूर्ण घर जळून खाक झालं, नेमकं काय घडलं जाणून घेऊ…

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीमधील घरात भीषण आग लागल्याचे दिसतेय. यावेळी काही लोक खिडकीबाहेर उभं राहून या आगीच्या घटनेचा व्हिडीओ शूट करतायत तर काही जण ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. या घटनेत पुढे काय घडलं हे सांगता येत नसलं तरी यात घराचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. ही आगीची घटना भीषण होती, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. ही आग देवपूजा करताना पेटतं धूप गादीवर पडल्याने लागल्याचं सांगितलं जातंय. यानंतर काही क्षणात या आगीने मोठा पेट घेतला, ज्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडलं.

या भीषण आगीच्या घटनेचा व्हिडीओ @SandipKapde नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पुण्यात धूप गादीवर पडलं अन् उडाला भडका, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून तरी लोकांनी देवपूजा करताना थोडी सावधगिरी बाळगा असे आवाहन केले जात आहे.