आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे आहे. पण शब्दाचा अर्थ सांगण्यात नाही तर जगण्यात खरी मज्जा आहे. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला आपल्या आयुष्य जगता आले पाहिजे. आयुष्यात अनेक चढ-उतार येतात, संकटे येतात त्यांचा सामोरे जात आले पाहिले. आनंद असो वा दु:ख प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. फार मोजके लोक असतात ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदाने जगता येते. असे लोक स्वत:सह इतरांनीही आनंदी करतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका रस्त्यावरील फळ विक्रेत्याचा आहे जो पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. हा प्रेरणादायी व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मी टक्कला आहे!”, डोक्यावर केस नसतानाही अनुपम खैर यांनी खरेदी केला ४०० रुपयांचा कंगवा; ह्रदयस्पर्शी व्हिडीओ केला शेअर

इस्टाग्रामवर iloovepune नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका रस्त्याच्या कडेला एक फळ विक्रेता बसलेला दिसत आहे. विक्रेत्याच्या समोर कॅरेटमध्ये काही फळे ठेवली आहेत. तसेच ग्राहाकांना आकर्षिक करण्यासाठी त्याने काही संत्री झाडाला लटकवली आहे. इतकंच नाही तर तो हटके स्टाईलमध्ये फळाचीं विक्री करत आहे. विक्रेत्यांनी डोक्यावर केळ ठेवले आहे, तर त्याच्या कानाजवळ दोन संत्री लटकवले आहेत. एवढचं नाही तरी त्याने गळात चक्क संत्र्याची माळ घातली आहे. आपला चेहरा मात्र त्याने झाकला आहे.. हातात कापलले कलिंगड आणि पपई घेऊन तो ग्राहकांना मजेशीर पद्धतीने बोलवत आहे. “ए गोड, गोड, गोड… लाल आहे, गोड आहे… शंभरला तीन आहेत, लाल कलिंगड, गोड कलिंगड” हे वाक्य अगदी सुरात म्हणत आहे. त्याचे हातवारे पाहून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत.

हेही वाचा – Video : MS DHONIचा फोटो समोर ठेवून तरुणीने तब्बल ८ तासात पूर्ण केले ११८०६ स्क्वॉट्स; गिनीज बुकमध्ये झाली नोंद!

व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. फळ विकण्यासाठी विक्रेत्याची मेहनत पाहून लोकांना त्याचे कौतूक वाटत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळत आहे. पुण्यातील हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”अजून काय प्रेरणा पाहिजे आयुष्यात!” व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत फळविक्रेत्याचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की,”भाऊ पोटासाठी काही पण काम कसं पण करायचा दम असला पाहिजे.” दुसऱ्याने लिहिले की, “पुणे तिथे काय उणे….संपला विषय” तिसऱ्याने लिहिले, “माल विकण्याची अतिशय सुंदर कला आहे.. खूप छान..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune fruit seller unique style of selling fruits motivational video goes viral on internet netizens reacts snk
Show comments